आयपीएल 2026 स्पर्धा रंगात येत असतानाच बीसीसीआयने महत्त्वाचा नियम (rule change) बदल लागू केला आहे. स्पर्धेतील दोन सामने पार पडले असून तिसऱ्या सामन्यापूर्वीच डीआरएससंदर्भातील हा नवा नियम चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी या बदलाबाबत कर्णधारांना माहिती देण्यात आली होती, मात्र आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम सामन्यांवर दिसू लागणार आहे.

नव्या नियमानुसार, डीआरएस (rule change) घेतल्यानंतर टीव्ही पंच केवळ ज्या निर्णयासाठी अपील करण्यात आले आहे त्याच बाबीची तपासणी करणार आहेत. मागील हंगामापर्यंत मात्र अशी मर्यादा नव्हती. एखाद्या झेलसाठी अपील घेतल्यावर पंच बॅटला चेंडू लागला का, तसेच चेंडू वाईड होता का, अशा इतर बाबींचीही तपासणी करत होते. त्यामुळे काही वेळा संघांकडून परिस्थितीनुसार हुशारीने डीआरएसचा वापर केला जात असल्याचे दिसून आले होते.
आता या नव्या बदलामुळे अशा प्रकारची ‘चालाखी’ रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने झेलसाठी अपील केले, तर फक्त झेल वैध आहे की नाही यावरच निर्णय दिला जाईल. फलंदाजाला जर वाटत असेल की चेंडू बॅटला लागलेला नाही किंवा तो वाईड होता, तर त्याला स्वतंत्रपणे अपील करावे लागेल. यासाठी त्याच्याकडे केवळ 15 सेकंदांचा कालावधी असेल. एकदा टीव्ही पंचांनी निर्णय दिल्यानंतर पुन्हा अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही.
याशिवाय दुखापतग्रस्त खेळाडूंविषयीही स्पष्टता देण्यात आली आहे. (rule change) एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाल्यास त्याच्या जागी ‘लाईक-टू-लाईक’ म्हणजेच समान प्रकारचा खेळाडूच मैदानात उतरवला जाईल. मात्र हा पर्याय आधीच निवडलेल्या पाच इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट्समधूनच निवडावा लागणार आहे. यष्टीरक्षक जखमी झाल्यास, प्लेइंग इलेव्हनमधील अन्य खेळाडूला ही जबाबदारी घ्यावी लागेल.
विदेशी खेळाडूंच्या (rule change) बाबतीतही नियम निश्चित करण्यात आला आहे. जर एखादा परदेशी खेळाडू जखमी झाला आणि त्या वेळी संघात आधीच तीन विदेशी खेळाडू मैदानात असतील, तरच त्याच्या जागी दुसरा विदेशी खेळाडू उतरवता येईल. अन्यथा भारतीय खेळाडूला संधी दिली जाईल. या सर्व बदलांमुळे आयपीएलमधील निर्णयप्रक्रिया अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच संघांकडून डीआरएसचा वापर अधिक जबाबदारीने केला जाईल, असेही मानले जात आहे.
हेही वाचा :
शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून