Nestlé या जगप्रसिद्ध कंपनीच्या KitKat चॉकलेटसंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युरोपमध्ये तब्बल 12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य इटलीतील नेस्लेच्या उत्पादन केंद्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेस्लेच्या कारखान्यात तयार करण्यात आलेली किटकॅट (shocking incident) चॉकलेटची मोठी खेप पोलंडकडे पाठवली जात होती. मात्र वाहतुकीदरम्यानच अज्ञात चोरट्यांनी ही संपूर्ण खेप लंपास केली. तब्बल 12 टन चॉकलेट गायब झाल्याने कंपनी आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेची माहिती स्वतः नेस्लेने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी चोरीची पुष्टी करताना सांगितले की, ग्राहकांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झालेला नाही. उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षा अबाधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या मदतीने चोरीला गेलेल्या चॉकलेटचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे, ही घटना Easter सणाच्या काही दिवस आधी घडली आहे. (shocking incident) या काळात चॉकलेटची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि ‘चॉकलेट हंट’सारख्या उपक्रमांमुळे बाजारात मोठी उलाढाल होते. अशा संवेदनशील काळातच ही चोरी झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर मानले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी यावर विनोदी मीम्स शेअर करत मजा घेतली असली, तरी दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात चॉकलेट नेमके कुठे गेले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. प्रशासनासमोर आता या गूढ चोरीचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.
हेही वाचा :
शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून