एप्रिल महिन्यात अनेक दिवस शाळांना सुट्टी असणार आहे. यामध्ये अनेक सणांचा, वीकेंडचा समावेश आहे. अनेक सणांना सार्वजनिक सुट्टी आहे त्यामुळे शाळादेखील बंद असणार आहेत.

एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा असते. यानंतर मे महिन्यात मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागतील. एप्रिलनंतर थेट विद्यार्थी जून महिन्यात शाळेत येतील.दरम्यान, एप्रिल महिन्यात मुलांच्या परीक्षा तर आहेत त्याचसोबत अनेक सुट्ट्यादेखील आहेत. एप्रिलमध्ये अनेक सण आहेत (holidays for schools) त्यामुळेच विद्यार्थ्यांना सुट्टी असणार आहे. एप्रिल महिन्यात एकूण किती दिवस बँका बंद असणार आहेत ते जाणून घ्या.एप्रिल महिन्यात अनेक दिवस सार्वजनिक सुट्ट्या आहेत.या दिवशी बँका, सरकारी कार्यालये आणि शाळा बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यात सणावारानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असणार आहेत. याचसोबत वीकेंडमुळे सुट्टी असणार आहे.
एप्रिल महिन्यात या दिवशी राहणार शाळा बंद
१ एप्रिल- १ एप्रिलला नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. काही राज्यांमध्ये शाळांना सुट्टी असणार आहे.
२ एप्रिल २०२६- २ एप्रिलला हनुमान जयंती आहे.(holidays for schools) त्यामुळे अनेक राज्यात शाळांना सुट्टी दिली आहे.
३ एप्रिल २०२६- या दिवशी गुड फ्रायडे आहे त्यामुळे अनेक राज्यात सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
५ एप्रिल- या दिवशी रविवार आहे त्यामुळे देशातील सर्व शाळा आणि बँका बंद असणार आहे.
१४ एप्रिल- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशातील सर्व शाळा बंद असणार आहेत. बँक, कॉलेज बंद असणार आहेत.
१५ एप्रिल- हा दिवस हिमाचल दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.
१७ एप्रिल- चंद्रशेखर जयंतीनिमित्त अनेक शाळांना सुट्टी असणार आहे.
दरम्यान, शाळांना या दिवशी सुट्टी असली तरीही अनेक शाळांच्या परीक्षा असतात. (holidays for schools) त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना खरंच सुट्टी आहे की नाही हे तपासायचे आहे. प्रत्येक राज्यात शाळाच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असणार आहे.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक