१ एप्रिल हे आर्थिक वर्ष असतं. यामध्ये नवे नियम आणि काही बदल लागू होतात.(changes) तसेच यंदाही काही मोठे निर्णय घेतले आहेत. ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशाला होणार आहे. पुढील बातमीत आपण LPG सिलेंडरच्या किमतींपासून ते आयकर नियम, PAN कार्ड प्रक्रिया आणि रेल्वेच्या तिकीटांमध्ये कोणते बदल किंवा नियमात बदल केले आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.सर्वप्रथम LPG, ATF, CNG आणि PNG च्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे आधीच इंधन बाजाराच्या ताणाला सामोरं जावं लागलं होतं . या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या 1 एप्रिलपासून LPG सिलेंडरच्या नव्या दरांची घोषणा करू शकतात. याचा परिणाम थेट घरच्या LPGवर होऊ शकतो.

टॅक्सच्या नियमात सुद्धा मोठा बदल होणार आहे. 1 एप्रिलपासून (changes) ‘आयकर अधिनियम, 2025’ लागू होणार आहे. 1961 पासून अस्तित्वात असलेला जुना कायदा बदलला जाणार आहे. नवीन करप्रणाली जास्त सोपी करण्याचा यामागचा उद्देश असणार आहे. करदात्यांवर असलेल्या नियमांचे ओझं याने कमी होणार आहे. या बदलांमध्ये Form 16 संदर्भातील नियमांमध्येही सुधारणा होणार आहेत. ITR भरण्यासाठी वापरला जाणारा Form 16 यापुढे उपलब्ध राहणार नाही. त्याऐवजी नवीन स्वरूपातील दस्तऐवज दिला जाईल. तसेच Form 16A चे नाव बदलून Form 131 करण्यात येणार असून तो संबंधित तिमाही TDS विवरणानंतर 15 दिवसांत देणे बंधनकारक असेल.

PAN कार्डशी संबंधित नियमही जास्त कडक होणार आहेत. (changes) 1 एप्रिल 2026 पासून PAN कार्ड बनवताना अर्जदारांना जास्त कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच रखडलेले अर्ज तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.दरम्यान, रेल्वे प्रवाशांसाठीही नवीन नियम लागू होणार आहेत. 1 एप्रिलपासून ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी तिकीट रद्द केल्यावर तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही. यापूर्वी ही मर्यादा चार तास होती. आठ ते 24 तास आधी तिकीट रद्द केल्यावर 50 टक्के परतावा मिळेल, तर 24 ते 72 तास आधी रद्द केल्यावर 25 टक्के कपात होईल. 72 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तुलनेने जास्त परतावा मिळणार आहे.

हेही वाचा :

फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद

घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार

देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *