लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता येण्यास उशिर झाला होता.(receiving)मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यानंतर आता मार्चच्या हप्त्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. लाडक्या बहिणींना मार्चचे १५०० रुपये कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता महिन्याच्या शेवटी येईल, (receiving)असं वाटलं होतं. फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, मागच्या महिन्यात फक्त फेब्रुवारीचाच हप्ता जमा झाला. मार्चचा हप्ता आलाच नाही. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली. मात्र, आता महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.
मार्चचा हप्ता लवकरच दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (receiving)एप्रिलच्या १५ तारखेआधी पैसे खात्यात येऊ शकतात. अजूनही अधिकृत तारीख समोर आलेली नाही. फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केले आहे त्यांचाच लाभ सुरु राहणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसीत दुरुस्ती केली आहे त्यांना तीन महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतात. महिलांना ४५०० रुपये मिळू शकतात.हे पैसे कधी येणार याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक