जलस्रोत विकासाच्या कामांमध्ये मोठा विलंब होत असून गडहिंग्लज तालुक्यातील बारा गावांमध्ये प्रकल्प रखडले आहेत. प्रशासनाच्या नोटिसांनंतरही कामे वेग घेत नसल्याची स्थिती आहे.

‘हर घर नल’ हे ब्रीद घेऊन केंद्र शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावांत नळपाणी योजना मंजूर झाल्या. साधारण दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या अनेक योजना अजूनही कार्यान्वित नाहीत. विशेष म्हणजे, जलस्रोतांची कामे १२ गावांत अजूनही प्रलंबित आहेत. (Gadhinglaj) काही कामे ठेकेदारांकडून, तर काही तांत्रिक कारणांमुळे रखडलेली आहेत. २५ वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून गावांना जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजनांसाठी ५० लाखांपासून चार कोटींपर्यंतचा निधी मंजूर झाला. त्याची कामेही सुरू झाली. दरम्यान, शासनाकडून बिले मिळण्यातील अडचणींमुळे अनेक ठेकेदारांनी कामाची गती कमी केली.
काम कोटीत झालेले असतानाही बिल मात्र लाखांत मिळू लागल्याने योजनांच्या कामांची रखडपट्टी झाली; परंतु, ठेकेदार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतानाही ठेका मंजूर कसा झाला?, हा ग्रामस्थांना पडलेला प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मुळात शासनाकडून येणारा निधी उशिरा येतो. (Gadhinglaj) तोपर्यंत ठेकेदाराने गुंतवणूक करून योजना मार्गी लावण्याची अपेक्षा असते.यात तसे घडले नसल्याचे सरकारी सूत्रांनीच सांगितले. नोटिसांवर नोटिसा देऊनही कामाची प्रगती संथच आहे. इंटक विहीर, कनेक्टिंग पाईप, पुरवठा विहीर, ट्रेंच गॅलरी, इनकेट कनेक्टिंग पाईप, विहीर दुरुस्ती, इनजंक्शन वेल अशा स्त्रोतांची कामे ठप्प आहेत. यातील आठ गावांतील स्रोतांची कामे ठेकेदारामुळे प्रलंबित आहे.
हसूरसासगिरीत देवस्थान जागेत स्रोताचे काम होणार आहे. (Gadhinglaj) त्याचा प्रस्ताव सादर केला आहे. वाघराळीत जुन्या विहिरीचे निर्लेखन आता मंजूर झाले आहे. तेगीनहाळमध्ये स्रोतासाठी नुकतीच जागा ताब्यात घेतली आहे. ही चार कामे तांत्रिक कारणाने रखडली होती, ती आता सुरू करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. जलस्रोताची कामे प्रलंबित असलेली गावे स्रोतांची कामे सुरू न झालेल्या गावात मुत्नाळ, हरळी खुर्द, हसूरसासगिरी, वाघराळी, बुगडीकट्टी, हिरलगे, कौलगे, माद्याळ कसबा नूल, सांबरे, डोणेवाडी, तेगीनहाळचा समावेश आहे. जरळीचे एकमेव काम सुरू झाले आहे. ही कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संबंधित ठेकेदारांना दिल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक