आंध्र प्रदेशमधील १७ वर्षीय मुलीवर ओडिशामध्ये सामूहिक बलात्कार (home) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सावत्र बापाकडून होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून ही मुलगी घर सोडून पळाली. ती ट्रेनने ओडिशा गेली. त्याठिकाणी गुंगीचे औषध देत तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना २९ मार्च रोजी ओडिशाच्या बेरहामपुर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आणि एका अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवले. पोलिसांनी पीडित मुलीच्या सावत्र वडिलांविरोधात देखील गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आंध्र प्रदेशच्या कडप्पा (home) जिल्ह्यामध्ये राहते. वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईने लग्न केले. त्यामुळे ती सावत्र बापासोबत राहत होती. सावत्र बाप या मुलीवर रोज लैंगिक अत्याचार करायचा. या त्रासाला कंटाळून तिने घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. ही मुलगी २४ मार्चला प्रशांती एक्स्प्रेस पकडून ओडिशाच्या बेरहामपूर येथे गेली. रेल्वे स्टेशनवर एका चहाच्या दुकानात तिला काम मिळाले. त्याच ठिकाणी तिची एका १५ वर्षांच्या मुलासोबत ओळख झाली.
२९ मार्चला या मुलाने पीडित मुलीची आपल्या दोन मित्रांसोबत भेट करून दिली.(home) या दोघांनी गुंगीचे औषध मिसळून पीडित मुलगी आणि त्या मुलाला पेय प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर दोघे बेशुद्ध पडले. त्यानंतर दोघांनी या मुलीवर बेशुद्धावस्थेत सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी काही स्थानिक नागरिकांना पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव पीडित मुलीला तात्काळ रुग्णालयात नेलं.
पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला तेव्हा तिने सांगितले की, ती १८ वर्षे ८ महिन्यांची असून चार दिवसांपूर्वी ती आंध्र प्रदेशमधून ओडिशाला ट्रेनने आली. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय अर्जुन आणि १९ वर्षीय आदित्य या दोन तरुणांना अटक केली. तर पोलिसांनी १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेत बालसुधारगृहात पाठवले. पोलिसांनी आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या सावत्र वडिलांविरोधात आंध्र प्रदेशमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी