सध्या राज्यात भेंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे.(crossed)अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्यांच्यावर बलात्कार केला. गेले कित्येक वर्ष अशोक खरातचे काळे कारनामे सुरु होते. आता या प्रकरणी अनेक महिलांनी अशोक खरात विरोधात तक्रार दाखल केली आहे. अशोक खरातला सध्या अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खरातने एका महिलेला भूरळ घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. (crossed)जेव्हा ही महिला गर्भवती झाली तेव्हा तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. आता सगळ्या गोळ्या भोंदूबाबाने कुठून आणल्या? त्याच्या तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात आणखी कोण जोडले गेले आहेत? हे देखील तपासले जाणार आहे.

दरम्यान, आरोपी अशोक खरातनं पीडितेच्या मुलांनाही धमकी दिली होती (crossed)अशी धक्कादायक माहिती समोर आल आहे. अशोक खरातने सर्वच मर्यादा ओलांडल्या असल्याचे दिसत आहे.अशोक खरात प्रकरणी आज 2 एप्रिल रोजी कोर्टात VCद्वारे सुनावणी सुरु आहे. SIT च्या मागणीनुसार भोंदू अशोक खरात व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आले आहे.पोलिसांनी कोर्टात सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष केले आहे.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *