अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा (प्रेमप्रकरण) तपास सुरू असताना याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. पुर्ण शहरात पसरलेल्या या रॅकेटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा (प्रेमप्रकरण) तपास सुरू असताना याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. पुर्ण शहरात पसरलेल्या या रॅकेटमधून धक्कादायक माहिती समोर आली असून, ड्रग्ज विक्री करणारे तसेच ते घेणारे अशा ७६ जणांची माहिती पोलिसांकडे आली आहे. आता हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आरोपी पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे) व शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर, उपनिरीक्षक अक्षय पाटील, चेतन धनवडे, पोलिस अंमलदार चेतन बराटे, शेलार, पाडळे, अनिरूद्ध गायकवाड, ज्ञानेश्वर तोडकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

उत्तमनगर पोलिस ठाण्यात एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. मुलगी प्रेमप्रकरणातून गेल्याचे समजले होते. गेल्या काही महिन्यांपासून या गुन्ह्यातील आरोपी राठ्या राठोड हा फरार होता. वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांच्याकडून हद्दीतील सराईतांची ‘परेड’ घेण्यात आली होती. तेव्हा त्यांनी हद्दीत काही बेकायदेशीर असेल तर कळविण्याचे सूचवले होते. तेव्हा पोलिस निरीक्षक क्षिरसागर यांना माहिती मिळाली त्यानूसार पोलिसांनी तिघांना अटक केली. तर, चौघांचा शोध सुरू आहे.

राठ्या राठोड याच्या मोबाईलची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गेल्या चार महिन्यात जवळपास ३०० हून अधिक ट्रान्झेक्शन झाल्याचे दिसून आले. हा व्यवहार जवळपास ९ लाखांचा होता. त्यात दोन ते अडीच हजारांचे ट्रान्झेक्शन जास्त प्रमाणात होते. तर, काही ट्रान्झेक्शन हे १० ते १५ हजारांचे होते. पोलिसांचा संशय बळावल्यानंतर पोलिसांनी या सर्व गोष्टी बारकाईने तपासल्या असता ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले. राठ्या राठोड याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केल्यानंतर ३०० ट्रान्झेक्शनमधील चाळणी केली. त्यात ७२ जणांना त्याने हे एमडी विकले असल्याचे दिसून आले. तर चौघांकडून ड्रग्ज विकत घेतल्याचे समोर आले आहे. त्यानूसार, आता पोलिस हे ड्रग्ज घेणाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवणार असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे पेणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत

हेही वाचा :

जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक

खुशखबर! आता वीज बिल होणार कमी

गुगलचं मोठं अपडेट, आता जीमेलमध्ये करु शकता ‘हा’ महत्त्वाचा बदल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *