आखाती देशांमध्ये सुरु असणाऱ्या युद्धांमुळे संपूर्ण जगावर परिणाम होत आहे.(price) देशात कच्च्या तेलाची आयात कमी होत आहे. याचा परिणाम थेट पेट्रोल डिझेलवर होत आहेत. भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी नायरा कंपनीने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केले होते. यानंतर अजून एका कंपनीने पेट्रोल डिझेलचे दर वाढवले आहेत. Shell India ने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. १ एप्रिलपासून हे दर लागू झाले आहेत.

कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. (price) यामुळे प्रायव्हेट इंधन विक्रेत्या कंपन्यांना नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक प्रायव्हेट कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरुत पेट्रोलचे दर ७.४१ रुपयांनी वाढले आहेत तर डिझेलच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे.आता सामान्य पेट्रोल ११९.८५ रुपये प्रति लिटर आहे तर पॉवर वेरिएंट पेट्रोलची किंमत १२९.८५ रुपये आहे. दरम्यान, स्थानिक भागातील टॅक्समुळे वेगवेगळ्या शहरात पेट्रोलचे दर वेगळे असणार आहे. डिझेलच्या किंमतीतदेखील वाढ झालीआहे. सामान्य डिझेल १२३.५२ रुपये आहेत तर प्रिमियम डिझेल १३३.५२ रुपये झाले आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, इराण-इस्त्रायलमधील युद्धामुळे तेलच्या किंमती वाढल्या आहेत. (price) त्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत.भविष्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती अजूनही वाढू शकतात. पेट्रोल डिझेलचे दर १४८ ते १६५रुपयांपर्यंत पोहचू शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मिडिया रिपोर्टनुसार, प्रायव्हेट इंधन विक्रेत्या कंपनी या दबावाखाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊनदेखील सरकारी इंधन विक्रेत्या कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.दरम्यान, प्रायव्हेट कंपन्यांना मात्र फटका बसत आहे. त्यामुळे त्यांनी किंमतीत वाढ केली आहे.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *