लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(deadline) आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी ईकेवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ३१ एप्रिलपर्यंत केवायसी करण्याची मुदतवाढ दिली आहे. ज्या महिलांनी अजूनही केवायसीतील चुका सुधारल्या नाहीत त्यांच्याकडे ही शेवटची संधी आहे. पुढच्या महिन्याभरात तुम्हाला केवायसी करायची आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु आहे. (deadline) काल ३१ मार्च रोजी ईकेवायसीठीची मुदत संपली होती. परंतु यासंदर्भात काही निवेदने आमच्याकडे प्राप्त झाली होती. ईकेवायसीसंदर्भातील काही तक्रारी होत्या. अजून मुदत देण्याची मागणी केली होती. मधल्या कालावधीत गारपीट किंवा काही अडचणींमुळे अनेक महिलांची केवायसी करायची राहिली होती. ईकेवायसी सप्टेंबर महिन्यात सुरु झाली होती. यासाठी दोन महिन्याची मुदत दिली होती.यानंतर मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली ईकेवायसीसाठी मुदत वाढवून दिली होती. त्यानंतर अनेकांनी चुकीची माहिती भरली होती.काहींना तांत्रिक बाबींमुळे लाभ मिळत नव्हता.

अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. (deadline) यासाठी आता ईकेवायसीची मुदत वाढवत आहोत. या महिन्याभराचा कालावधी आहे. ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांच्या सूचनेप्रमाणे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. ईकेवायसी करताना जर काही चुका झाल्या असतील तर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलांना ३० एप्रिलपर्यंत केवायसी करायची आहे, असं मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा

या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?

चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *