“रूपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं की अशोक खरात हे माझे गुरु आहेत,(calls)त्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही. आमचे फक्त कौटुंबिक संबंध आहेत. मात्र, सीडीआरमधून समोर आलेल्या माहितीनुसार रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 177 फोन कॉल झालेले आहेत. त्याचप्रमाणे, त्यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांचे अशोक खरात यांच्याशी 236 कॉल झालेले आहेत,” असं अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे.

सर्वाधिक संभाषण तृप्ती खरात यांच्याशी झालं असून रूपाली चाकणकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. (calls)त्यांच्यात एकूण 33,727 सेकंद इतके संभाषण झालेले आहे. इतका वेळ कोणत्याही गुरुशी कोणी बोलत नाही, त्यामुळे रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात नेमके काय संभाषण झाले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली आहे.

जगदंबा पतसंस्था आणि समता पतसंस्थेत खरात शेकडो खात्यांचा नॉमिनी होता.(calls) धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानेही खाते होते. 100 कोटीहुन अधिक रुपयांचे खरातने स्वतःच व्यवहार केले. खरातने अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन कारनामे केले आहेत. अशोक खरात स्वतःच सगळी खाती हाताळत होता. इतकंच काय तर खरातचाच सगळ्या खात्यांना मोबाईल नंबर लिंक होता. दोन्ही पतसंस्थेचे चेअरमन आणि मॅनेजर यांची SIT कडून चौकशी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *