इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तणाव आणखी तीव्र झाला असून इस्रायलच्या (Iran-Israel conflict) संरक्षण यंत्रणेला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलच्या पेताह टिकवा शहरातील अत्याधुनिक ड्रोन निर्मिती करणाऱ्या ‘एयरोसोल’ कंपनीच्या फॅक्टरीवर इराणने अचूक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यात फॅक्टरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पादन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे.

‘एयरोसोल’ ही इस्रायलची महत्त्वाची एरोस्पेस कंपनी असून ती उच्च-तंत्रज्ञानावर आधारित टेहळणी ड्रोन आणि त्यांचे सुटे भाग तयार करते. विशेषतः ही ड्रोन प्रणाली कमी आवाजात शत्रूच्या हद्दीत प्रवेश करून दीर्घकाळ गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळेच इस्रायलच्या संरक्षण दलासाठी या ड्रोनना “डोळे आणि कान” असे संबोधले जाते.
हल्ल्यानंतर या फॅक्टरीतील उत्पादन (Iran-Israel conflict) थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचा थेट परिणाम इस्रायलच्या चालू लष्करी मोहिमांवर होऊ शकतो. सध्या इराणविरुद्ध सुरू असलेल्या ड्रोन ऑपरेशन्समध्ये अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नव्या ड्रोनचा पुरवठा उशिरा होणे इस्रायलसाठी धोरणात्मकदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, ‘एयरोसोल’ कंपनी केवळ इस्रायलपुरती मर्यादित नसून अमेरिका आणि इतर सहयोगी (Iran-Israel conflict) देशांनाही ड्रोन आणि संबंधित तंत्रज्ञानाचा पुरवठा करते. त्यामुळे या हल्ल्याचे परिणाम जागतिक संरक्षण पुरवठा साखळीवरही जाणवू शकतात. युद्धाच्या ३५व्या दिवशी इराणने इस्रायलच्या लष्करी उत्पादन केंद्रांना लक्ष्य करण्याची रणनीती अवलंबल्याचे संकेत मिळत असून त्यामुळे या संघर्षाचे स्वरूप अधिक व्यापक आणि गंभीर होत चालले आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी