राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(banned) आता देशातील सर्व टोल प्लाझावर रोख रक्कम घेतली जाणार नाहीये. आता सर्व टोल नाक्यावर फक्त डिजिटल पेमेंट घेतले जाणार आहे. १० एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आता १० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवर रोख रक्कम घेतली जाणार नाही.सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर रोख रक्कम घेणे बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. यानंतर हे पाऊल उचलण्यत आले होते. यानंतर टोल पूर्ण डिजिटल पद्धतीने स्विकारला जाणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याआधीच सांगितले होते की, (banned)आता सर्व टोल पेमेंट फक्त फास्टॅग किंवा यूपीआयद्वारेच करावे लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, लेनची क्षमता वाढवून प्रवास सुलभ करणे, टोल प्लाझावरील गर्दी कमी करणे, टोल व्यव्हारांमध्ये पारदर्शकता आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.प्राधिकरणाने सांगितले की, डिजिटल पेमेंटकडे वळल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील १,१५० पेक्षा जास्त टोल नाक्यावर वाहतूक व्यवस्थित होईल.
त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.सरकारने काही टोल नाक्यावरील (banned) टोल दरात सुधारणा केली आहे.याचसोबत फास्टॅग वार्षिक पासचे दर वाढवले आहेत. याआधी फास्टॅग वार्षिक पास ३००० रुपयांना होता. त्यानंतर या पासची किंमत आता ३०७५ रुपये झाली आहे. प्रवाशांना अतिरिक्त ७५ रुपये मोजावे लागणार आहेत. हा पास १ वर्षासाठी वॅलिड असणार आहे. याचसोबत तुम्ही २०० ट्रीपपर्यंत या पासचा वापर करु शकतात. फक्त राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना या पासचा वापर करता येणार आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी