जग आधीच युद्धाच्या सावटाखाली असताना आता नव्या संकटाने (new crisis) परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. या तणावाचा थेट परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर झाला असून आखाती देशांमधून होणारी इंधन वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. परिणामी अनेक देशांमध्ये इंधनटंचाई निर्माण झाली असून काही ठिकाणी लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला आहे, तर काही देशांनी कामाचा आठवडा चार दिवसांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

या जागतिक घडामोडींची झळ भारतलाही बसली आहे. देशात गॅसचा तुटवडा जाणवत असून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पुरवठा सुरळीत नसल्याने अनेक हॉटेल आणि खाद्य व्यवसाय अडचणीत आले असून काही ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, या संकटात आणखी भर (new crisis) घालत चीनमधून चिंताजनक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये जनावरांमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या नव्या आजाराचा उद्रेक झाला आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी चीन सरकारने मोठ्या प्रमाणावर जनावरांना मारण्याची मोहीम हाती घेतली असून खबरदारीचा उपाय म्हणून देशाच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. सध्या तरी या आजाराचा माणसांमध्ये संसर्ग झाल्याचे एकही प्रकरण समोर आले नसल्याचे चीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चीनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या आजाराची लक्षणे सेरोटाइप स्वरूपाची (new crisis) असून त्यावर लसीकरण उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः उत्तर-पश्चिम चीनमध्ये या आजाराचा प्रचंड प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा आजार परदेशातून चीनमध्ये आला असल्याचा दावा देखील चीनने केला आहे.
काही वर्षांपूर्वी कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते आणि त्याचा उगमही चीनमधून झाल्याची चर्चा होती. आता पुन्हा एकदा चीनमध्ये नव्या आजाराचा उद्रेक झाल्याने जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. युद्ध आणि आरोग्य संकट यांच्या दुहेरी दबावामुळे जगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी