हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही काही भागात पावसाचा मोठा इशारा दिला. पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावताना दिसत आहे. पावसामुळे मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अवकाळी पाऊस राज्यातून जाण्याचे नाव घेत नाही. गारपिटीसह पाऊस होताना दिसत आहे. (weather) त्यामध्येच आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. आज राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. काही भागात उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. गेल्या आठ दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून अवकाळीचे ढग राज्यावर होते. आता कुठे अवकाळी पाऊस कमी होताना दिसत आहे. मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. गडचिरोली आणि चंद्रपूर सोडले तर राज्यातील इतर भागात आज उष्णता वाढण्याचे संकेत आहेत.

अनेक दिवसानंतर पावसापासून दिलासा मिळत आहे. रब्बीचे हाताशी आलेले पिक शेतकऱ्यांचे गेले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 37.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे झाली. महाबळेश्वर येथे नीचांकी 13.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सोलापूरमध्येही कडाक्याचे उन्ह होते. सोलापूरात 37 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवले गेले.

जळगाव जिल्ह्यातील आंबा उत्पादकांनाही अवकाळी आणि वादळाचा फटका बसला. पंचनामे करून मदतीची मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्याकडून होत आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकरी आहेत. सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस आणि वादळी वारा (weather) यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शेतकरी चिंतेत आहेत.

नाशिकच्या निफाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. कोटमगाव येथील शेतकऱ्याच्या टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आता तोंडाशी आलेला घास हिरावला. गेल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (weather) त्यामध्येच आजही काही भागात पाऊस पडणार आहे.

हेही वाचा :

हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

गणिताच्या शिक्षकाने मागितली 1 कोटी 40 लाखांची खंडणी; 300 CCTV तपासले, नेमके प्रकरण काय?

आता थेट ATM मधून काढा PF चे पैसे, UPI सुविधाही होणार सुरू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *