बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय (constituency) वातावरण चांगलेच तापू लागले आहे. बारामती येथे ही निवडणूक होत असून, अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही लढत रंगणार आहे. दरम्यान, काँग्रेस पक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी या निवडणुकीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

जय पवार यांनी स्पष्ट केले की, (constituency) ही निवडणूक पूर्णतः भावनिक स्वरूपाची आहे. अजितदादांच्या अकाली निधनामुळे बारामतीकर अजूनही दुःखातून सावरलेले नाहीत, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांना विनंती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, लोकशाही पद्धतीने निवडणूक झालीच, तर अजितदादांच्या कामाचा विचार करून मतदार आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (constituency) यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबतही जय पवार यांनी माहिती दिली. येत्या सोमवारी त्या आपला अर्ज दाखल करणार असून, या वेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पणदरे पंचक्रोशीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी (constituency) करताना जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत विचारले असता, उपलब्ध माहितीपैकी बरीच माहिती आमदार रोहित पवार यांनी आधीच जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम अहवाल आल्यानंतर याबाबत सविस्तर बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना जय पवार म्हणाले की, हा विषय वरिष्ठ पातळीवरील आहे. मात्र पवार कुटुंब एकसंघ असून, अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्राने ही एकजूट पाहिली असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा :

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *