इराण-इस्रायल संघर्षामुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ५ किलोच्या एफटीएल गॅस सिलिंडरचा दैनंदिन पुरवठा दुप्पट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर एलपीजी (LPG) पुरवठ्यावर परिणाम झाला असताना, भारताने आपल्या अंतर्गत वितरण व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. पेट्रोलियम विभागाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत की, तेल विपणन कंपन्यांच्या सहकार्याने नागरी पुरवठा विभागाने हा वाढीव पुरवठा सुनिश्चित करावा. ५ किलोच्या छोट्या सिलिंडरची मागणी प्रामुख्याने मजूर आणि स्थलांतरित कामगारांमध्ये जास्त असते, (5 kg Cylinders) त्यांना या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार आहे.

इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी हा सागरी मार्ग विस्कळीत झाला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारत असून भारतीय जहाजांचा मार्ग मोकळा झाला आहे. (5 kg Cylinders) नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, शिवालिक, नंदा देवी, पाइन गॅस यांसह एकूण सात एलपीजी टँकर्स भारतात सुखरूप दाखल झाले आहेत. या जहाजांद्वारे सुमारे ६,५०,००० टन एलपीजी साठा उपलब्ध झाला असून, यामुळे देशातील गॅस टंचाई कमी होण्यास मदत होईल.

भारत आपल्या एलपीजी गरजेपैकी साधारणतः ८५ ते ९० टक्के गॅस आयात करतो, (5 kg Cylinders) ज्याचा मोठा हिस्सा आखाती देशांतून येतो. पुरवठा साखळीतील अडथळे लक्षात घेऊन सरकारने महत्त्वाचीपावले उचलली आहेत. देशांतर्गत एलपीजी उत्पादनात ३६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या देशात दररोज ५० लाख एलपीजी सिलिंडरचे वितरण केले जात असून, पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता इतर देशांकडूनही आयात वाढवण्यावर भर दिला जात आहे.या संकटकाळात केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एलपीजीचा तुटवडा जाणवणार नाही आणि सर्वसामान्यांची चूल पेटती राहील, अशी खात्री प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा :

हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

गणिताच्या शिक्षकाने मागितली 1 कोटी 40 लाखांची खंडणी; 300 CCTV तपासले, नेमके प्रकरण काय?

आता थेट ATM मधून काढा PF चे पैसे, UPI सुविधाही होणार सुरू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *