मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी होणारा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 32 वा सामना असणार आहे. राजस्थानला हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची संधी आहे.

मुंबई इंडियन्ससमोर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं आव्हान असणर आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. तर हार्दिक पंड्या याचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित आहे. (Mumbai Indians) त्यामुळे हार्दिक पुन्हा एकदा 1 सामन्यानंतर एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. हार्दिकला अस्वस्थ वाटत असल्याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध शनिवारी 4 एप्रिलला झालेल्या सामन्याला मुकावं लागलेलं. त्यामुळे सूर्यकुमार यादव याने पलटणचं नेतृत्व केलं होतं. मात्र आता हार्दिक सज्ज आहे. मुंबईसमोर राजस्थान विरूद्ध गुवाहाटीतील होणाऱ्या सामन्यात दुहेरी आव्हान असणार आहे. हे आव्हान नक्की काय आहे?

राजस्थान या मोसमात आतापर्यंत अजिंक्य आहे. राजस्थानने पहिल्या 2 सामन्यांत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सवर मात केली आहे. सलग 2 विजयांमुळे राजस्थानचा विश्वास वाढला आहे. (Mumbai Indians) त्यात राजस्थान तिसरा सामना घरच्या मैदानात खेळणार आहे. त्यामुळे राजस्थानला घरच्या चाहत्यांचा पाठिंबा असणार आहे. राजस्थानकडे मुंबईला पराभूत करुन सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकण्याची संधी आहे. तर मुंबईसमोर पराभवानंतर विजयी ट्रॅकवर परतण्यासह राजस्थानला विजयी हॅट्रिकपासून रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.राजस्थान विरुद्ध मुंबईत 2022 पासून एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. या 6 पैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आकडे पाहता मंगळवारीही चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

क्रिकेट चाहत्यांना मंगळवारी राजस्थान-मुंबई सामन्यानिमित्ताने वैभव सूर्यवंशी विरुद्ध जसप्रीत बुमराह अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज आहे. तर वैभव सूर्यवंशी यानेही गेल्या वर्षभराच चमकदार कामगिरी केलीय. मात्र मंगळवारी वैभवसमोर बुमराहचं आव्हान असणार आहे. दोघेही पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे वैभव बुमराहचा कसा सामना करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान हार्दिक पंड्या याच्या कमबॅकमुळे मुंबईची ताकद वाढेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हार्दिक बॅटिंग, बॉलिंगसह फील्डिंगही लाजबाव करतो. (Mumbai Indians) त्यामुळे मुंबईची या तिन्ही आघाड्यांवर ताकद वाढली आहे. अशात हार्दिक किती यशस्वी ठरतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा :

हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

गणिताच्या शिक्षकाने मागितली 1 कोटी 40 लाखांची खंडणी; 300 CCTV तपासले, नेमके प्रकरण काय?

आता थेट ATM मधून काढा PF चे पैसे, UPI सुविधाही होणार सुरू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *