मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढील सामन्यात खेळणार की नाही (Hardik Pandya) याबाबतची अनिश्चितता आता जवळपास संपली आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2026 मधील दिल्लीविरुद्धच्या मागील सामन्यात त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले होते, मात्र त्या लढतीत मुंबईला पराभव पत्करावा लागला.

४ एप्रिल रोजी अरुण जेटली (Hardik Pandya) स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हार्दिक आजारपणामुळे खेळू शकला नव्हता. नाणेफेकीवेळी सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले होते की, हार्दिकची तब्येत चांगली नसल्याने त्याला विश्रांती देण्यात आली. त्याच्या गैरहजेरीत मधल्या फळीत मुंबई इंडियन्सची फलंदाजी कमकुवत दिसली आणि संघाला सहा गडी राखून पराभव सहन करावा लागला.
दरम्यान, आता मुंबई इंडियन्ससाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. (Hardik Pandya) गुवाहाटी येथे होणाऱ्या पुढील सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने संघासोबत सराव सुरू केला असून तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती संघाच्या सपोर्ट स्टाफकडून देण्यात आली आहे. गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हार्दिक जखमी नव्हता, तर केवळ तब्येतीच्या कारणामुळे तो मागील सामना खेळू शकला नाही. मात्र आता त्याने दोन तासांचा सराव सत्र पूर्ण केले असून तो निवडीसाठी उपलब्ध आहे.
७ एप्रिल रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता खूपच वाढली आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मासह मुंबईच्या खेळाडूंनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याचीही माहिती समोर आली आहे, ज्यामुळे संघ सकारात्मक वातावरणात सामन्याची तयारी करत आहे.
दरम्यान, युवा खेळाडू (Hardik Pandya) वैभव सूर्यवंशीबाबत विचारले असता पारस म्हाम्ब्रे यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुक करत तो आता संघासाठी नवीन नसल्याचे सांगितले. तसेच रवि बिश्नोईबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, तो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि यंदाही त्याच्या खेळात विशेष बदल दिसत नाही. एकूणच, हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास वाढला असून राजस्थानविरुद्धच्या सामन्यात संघ अधिक मजबूतपणे मैदानात उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार
चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!