जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचे कारण, यंदाची थीम आणि आरोग्याच्या आव्हानांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे उपाय करता येतील ते जाणून घ्या.

दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिवशी 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटना स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक पातळीवर निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींंचं आणि संस्थांचं कौतुक करून त्यांना ओळख देण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. जागतिक आरोग्य संघटना ही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंतर्गत असेलली एक स्वतंत्र संस्था असून, सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्याचं जागतिक पातळीवर नेतृत्व करते.
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास 1945 मध्ये शांतता आणि लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. आणि उत्तम जीवनासाठी आरोग्य महत्त्वाचं असल्यानं त्यानंतर ७ एप्रिल १९४८ रोजी ‘जागतिक आरोग्य संघटनेची’ निर्मिती करण्यात आली. (World Health Day) याच आठवणीत दरवर्षी ७ एप्रिलला ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. दिवशी जागतिक आरोग्य सभागृह स्थापन झाले, जे संस्थेच्या कामकाजाचे मार्गदर्शन करते. ची स्थापना च्या आणि यांचा संगम करून करण्यात आली.भारत संस्थापक सदस्य म्हणून 1948 जानेवारीत सामील झाला.1951 पासून ने जागतिक सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नेतृत्व सुरू केले.
जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व
हा दिवस आपल्याला जागतिक आरोग्यविषयक आव्हानांची आठवण करून देतो.
सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करणे,
वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून आरोग्य सुधारणा करणे,
जागतिक सहयोगाद्वारे आरोग्य समस्यांवर उपाय शोधणे,
यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे “टुगेदर फॉर हेल्थ. स्टॅंड विथ सायन्स”. ही संकल्पना वैज्ञानिक पुराव्यांवर आधारलेले निर्णय घेण्याचे, जागतिक आरोग्य आव्हानांवर एकत्रितपणे उपाय शोधण्याचे आणि आरोग्याशी संबंधित पसरत असलेल्या चुकीच्या माहितीला प्रभावीपणे तोंड देण्याचे महत्त्व अधोरेखित करते.थीम ‘वन हेल्थ’ या दृष्टिकोनावर भर देते, (World Health Day) ज्यात मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्या आरोग्याचा परस्परसंबंध अधोरेखित केला जातो. जागतिक आरोग्य दिन आपल्याला एकत्र येऊन सर्वांसाठी अधिक निरोगी उद्याचे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो.
जागतिक आरोग्य दिन हा देश, संस्था आणि व्यक्तींना एकत्र येऊन जागतिक आरोग्याशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रेरित करतो, (World Health Day) ज्यामागील उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत राहणे हे आहे.वैज्ञानिक आधारावर घेतलेले निर्णय, संयुक्त संशोधन आणि वन हेल्थ या दृष्टिकोनाच्या मदतीने जागतिक आरोग्य दिनाचा मुख्य संदेश म्हणजे चुकीची माहिती रोखणे आणि सर्वांसाठी निरोगी असे जग घडवणे हा आहे.
हेही वाचा :
गणिताच्या शिक्षकाने मागितली 1 कोटी 40 लाखांची खंडणी; 300 CCTV तपासले, नेमके प्रकरण काय?
आता थेट ATM मधून काढा PF चे पैसे, UPI सुविधाही होणार सुरू