छत्तीसगडमधील कोरबा जिल्हा येथे एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या सात वर्षांच्या निरागस मुलावर अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ एप्रिल रोजी पाली (heartbreaking incident) पोलीस ठाणे हद्दीत घडली. गावात राहणारा हा मुलगा इतर मित्रांसोबत तलावात अंघोळ करण्यासाठी गेला होता. त्याच वेळी एका तरुणाने त्याला फसवून आपल्यासोबत नेले. फळ खाऊ घालण्याचे आमिष दाखवत त्याने मुलाला एकांतात नेले आणि त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने विरोध केल्यावर आरोपीने संतापाच्या भरात त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला केला.
या हल्ल्यात मुलाला गंभीर मारहाण करण्यात आली. दगडाने वार करत त्याला जखमी (heartbreaking incident) केल्यानंतरही आरोपी थांबला नाही. गुन्हा लपवण्यासाठी त्याने मुलाला उचलून शेतातील एका विहिरीत फेकून दिले. या संपूर्ण घटनेदरम्यान काही मुलांनी आरोपीला त्या मुलासोबत जाताना पाहिले होते, ज्यामुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला.
दरम्यान, मुलगा घरी (heartbreaking incident) परतला नाही म्हणून कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेतला. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधमोहीम राबवत असताना गावातील विहिरीतून मुलाचा मृतदेह सापडला आणि या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित तरुणाला काही तासांतच अटक केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा :
अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार
मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार