नाशिकच्या भोंदूबाबानंतर नागपूरमध्ये देखील असेच प्रकरण समोर आले आहे. (Godman)पूजा करून आशीर्वाद देतो असे म्हणत नागपूरमधील भोंदूबाबाने महिलेवर बलात्कार केला. आरोपी भोंदूविरोधात महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यां भोंदूबाबाला अटक केली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या भोंदूबाबाची चौकशी करत आहेत. त्यांच्या जाळ्यात आणखी किती महिला अडकल्या आहेत याचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये विवाहितेवर(Godman) अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. पूजा करून आशीर्वाद देण्याच्या नावाखाली या भोंदूने महिलेच्या घरी येत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी नागपूरच्या सक्करदरा पोलिस ठाण्यात बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला आहे. नागपूर पोलिसांनी या भोंदूबाबाला अमरावतीमधून अटक केली. ताहीर बेग वय ६५ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे.

पीडित महिला खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.(Godman) तिचा नवरा ऑक्टोबर महिन्यापासून बेपत्ता आहे. एका लग्न समारंभात तिची भोंदूबाबाशी ओळख झाली. नवऱ्याला परत आणण्यासाठी पूजा करावी लागेल असे त्याने महिलेला सांगितले. महिलेच्या घरी जाऊन भोंदू बाबाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत सांगितले. महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्याने तिला धमकी देखील दिली. याची वाच्यता केल्यास देवाचा कोप होईल अशी भीती त्याने दाखवली. मात्र नंतर पीडितीने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार केली.त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली.

हेही वाचा :

लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूर, सनी देओल या अभिनेत्यांनी जी फि घेतलीय तो आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *