राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत (scheme launched) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दरमहा १५०० रुपयांच्या आर्थिक सहाय्यावर आता काही लाभार्थींना गंडांतर येण्याची शक्यता आहे. १ मे २०२६ पासून अपात्र ठरणाऱ्या तसेच ई-केवायसी प्रक्रियेत त्रुटी असलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाऊ शकतो, असे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ ही अंतिम मुदत दिल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांनी आधीच ई-केवायसी केली आहे, पण त्यामध्ये काही चुका राहिल्या असतील, अशा लाभार्थींना ही शेवटची संधी मानली जात आहे. या कालावधीत आवश्यक दुरुस्ती न केल्यास पुढील महिन्यापासून आर्थिक मदत थांबू शकते.
राज्य सरकारने विधानसभा (scheme launched) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केली होती आणि अल्पावधीतच लाखो महिलांनी याचा लाभ घेतला. मात्र, तपासणीत काही अर्जदारांनी निकष पूर्ण न करताही लाभ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे शासनाने ई-केवायसीच्या माध्यमातून पात्रता पडताळणी सुरू केली आहे. सरकारने यापूर्वीही ई-केवायसीसाठी मुदत दिली होती. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण झाला, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुरुस्तीसाठी वेळ देण्यात आला. आता अंतिम संधी म्हणून एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही मुदत केवळ दुरुस्तीपुरतीच असून नव्याने ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
दरम्यान, ज्या महिलांनी ई-केवायसी केलेलीच नाही, त्यांच्याबाबत अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट (scheme launched) झालेला नसला तरी निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थींवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लाभ सुरू ठेवायचा असल्यास तातडीने माहिती तपासून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लाभार्थींना त्यांच्या अर्जाची स्थिती आणि यादीतील नाव तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून मोबाईल क्रमांक व पासवर्डच्या साहाय्याने माहिती पाहता येणार आहे. आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकून आपण पात्र आहोत की नाही, हेही सहज कळू शकते.
हेही वाचा :
अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार
मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार