भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे (political atmosphere) वळण येत असून, आता कथित कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) लिक प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचा कथित सीडीआर आपल्या ताब्यात असल्याचा दावा करत अनेक खळबळजनक आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, खरात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल १७ वेळा फोनवर संवाद झाला होता. तसेच चंद्रकांत पाटील आणि सुनिल तटकरे यांच्यासोबतही कॉल झाल्याचा दावा त्यांनी केला.

या आरोपांमुळे राजकीय (political atmosphere) वर्तुळात खळबळ उडाली असताना, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटी पथकाने सावध भूमिका घेतली आहे. पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करताना, सीडीआर लिक प्रकरणाची चौकशी शासन स्तरावर सुरू असल्याचे सांगितले. या लिकमागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेतला जात असून चौकशीनंतरच सत्य समोर येईल, असे त्यांनी नमूद केले. मात्र दमानिया यांनी केलेल्या दाव्यांवर त्यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सीडीआर लिक होण्यामागील कारणांचा सखोल तपास केला जाईल आणि दोषींना वाचवले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोपही या प्रकरणात रंगले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (political atmosphere) यांनी दमानिया यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत, हे कॉल डिटेल्स एका विशिष्ट राजकीय अजेंड्याचा भाग असल्याचा आरोप केला. त्यानंतर दमानिया यांनीही अंधारे यांच्यावर टीका करत आपली भूमिका ठाम ठेवली. एकूणच, अशोक खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी तपासापुरते मर्यादित न राहता, राजकीय संघर्षाचे केंद्र बनले आहे. सीडीआर लिक प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने जाते आणि त्यातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार
मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार