पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठा दिलासा देणारी घडामोड समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण संघर्षात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली असून, इराणनेही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली होती, ज्याचा थेट परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर झाला होता. भारत मोठ्या प्रमाणावर एलपीजी आणि कच्चे तेल पश्चिम आशियातून आयात करतो. (cylinders) त्यामुळे या मार्गातील अडथळ्यांमुळे देशात इंधन आणि गॅस टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता सामुद्रधुनी पुन्हा खुली होत असल्याने परिस्थिती हळूहळू पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. इराणवर नियोजित हल्ला थांबवण्याच्या बदल्यात इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतुकीची हमी दिली आहे.(cylinders) दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनीही या युद्धविरामाला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यांसाठी सर्व व्यापारी जहाजांना सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्याची परवानगी दिली जाईल.

या निर्णयाचा भारतावर तातडीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. भारतीय ध्वज असलेले एलपीजी टँकर्स ‘ग्रीन सान्वी’ आणि ‘ग्रीन आशा’ हे सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना झाले असून लवकरच ते भारतीय किनाऱ्यावर पोहोचणार आहेत. याशिवाय, पर्शियन आखातात अडकलेली इतर जहाजेही आता मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.भारत आपल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या गरजेपैकी सुमारे 60 टक्के आयातीवर अवलंबून आहे आणि त्यातील बहुतांश पुरवठा पश्चिम आशियातून येतो. (cylinders) त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणे हा भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. पुढील काही दिवसांत देशातील इंधन पुरवठा सुरळीत होईल आणि दरांमध्येही स्थिरता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *