पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शरद पवार (politics) यांच्या गटाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाला रामराम ठोकत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आज त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असून या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. कागल मतदारसंघातून त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून (politics) त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. स्वतः घाटगे यांनीही माध्यमांशी बोलताना भाजपमध्ये प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले होते. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपशी असलेला जवळचा संबंध हे या निर्णयामागील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे.

भाजपमध्ये परत येण्याबाबत बोलताना घाटगे यांनी समाधान व्यक्त केले. (politics) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी अधोरेखित केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा काम करण्याची संधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या घडामोडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *