महाराष्ट्रातील प्रशासनात सध्या मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे वारे वाहताना दिसत आहेत. (chartered officers) गेल्या आठवड्याभरात राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरू असून, शासनाच्या या निर्णयामुळे प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर फेरबदल झाले आहेत. आठवडाभरात ३५ पेक्षा अधिक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यामुळे विविध विभागांमध्ये नवे नेतृत्व पाहायला मिळत आहे.

२ एप्रिल रोजी २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने प्रशासनात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. या बदल्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, विविध विभागांतील कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यातील महाराष्ट्र राज्य शेती (chartered officers) महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रंजन महिवाल यांची बदली महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रूचेश जयवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना मुंबईतील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा’च्या प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमित रंजन यांची नाशिकमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली झाली आहे, तर त्यांच्या जागी लक्ष्मण राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, बालहक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी पंकज देवरे यांची नियुक्ती करण्यात (chartered officers) आली आहे. महावितरणच्या कल्याण विभागातील सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप जगदाळे यांची मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहसचिव म्हणून बदली झाली आहे, तर त्यांच्या जागी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच श्वेता सिंघल यांची नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्व बदल्यांमुळे महसूल, कृषी, ऊर्जा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल झाले असून, शासनाच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासन अधिक कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा :

अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार

मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *