ब्रिटनमधील नॉर्थम्बरलँड येथे झालेल्या पुरातत्व खोदकामात अमेरिकेतून (archaeological)आलेल्या विद्यार्थिनीने असा अद्भुत शोध लावला की तज्ज्ञही थक्क झाले आहेत. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणारी यारा सुझा हिने तिच्या आयुष्यातील पहिल्याच खोदकामात अवघ्या ९० मिनिटांत सोन्याचा आर्टिफॅक्ट शोधला. तपासाअंती हे सोने तब्बल १२०० वर्षे जुने असल्याचे समोर आले आहे.
सोन्याचा तुकडा कसा दिसतो? ही वस्तू सोन्याची असून केवळ ४ सेंटीमीटर लांब आहे. (archaeological)आकाराने ती लहान नॉब किंवा पिनसारखी भासते. विशेष म्हणजे, २०२१ साली याच ठिकाणी आणखी एक लहानसाच सोन्याचा आर्टिफॅक्ट सापडला होता. तज्ज्ञांच्या मते, हे दोन्ही वस्तू सामान्य दागिने किंवा पिन नसून त्या धार्मिक वा औपचारिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू असाव्यात.

या भागाचे ऐतिहासिक महत्त्व ज्या ठिकाणी हा शोध लागला तेथे प्राचीन काळी डेरे स्ट्रीट नावाचा रोमन रस्ता होता. या मार्गाचा वापर स्कॉटलंडपर्यंत वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी होत असे. त्यामुळे या भागाला व्यापारी व धार्मिक अशा दोन्ही दृष्टीने मोठे महत्त्व आहे.तज्ज्ञांची मते खोदकामाचे नेतृत्व करणारे न्यूकॅसल युनिव्हर्सिटीचे प्रा. (archaeological)जेम्स गेरार्ड यांनी सांगितले की, “या सोन्याच्या वस्तू जाणूनबुजून पुरल्या असाव्यात. प्राचीन काळात सोने हे शक्ती व धार्मिक श्रद्धेचे प्रतीक होते. त्यामुळे या वस्तूंचा संबंध धार्मिक अनुष्ठानांशी असू शकतो.”
ब्रिटनचे पुरातत्व तज्ज्ञ एंड्रयू एगेट यांनी म्हटले की, “हा शोध आर्कियोलॉजिस्ट आणि मेटल डिटेक्टरिस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांचे एक उत्तम उदाहरण आहे. अशा शोधांमुळे इतिहासातील गुपिते उलगडत राहतात.” आता या दोन्ही वस्तूंचा पुढील वैज्ञानिक तपास होणार असून त्यांना ब्रिटनच्या पोर्टेबल एंटिक्विटीज स्कीम अंतर्गत अधिकृत मान्यता मिळणार आहे.

पोलंडमधील आणखी एक खजिना शोध याच काळात पोलंडमध्येही इतिहासाचा एक वेगळा किस्सा घडला. कालिस्ज शहराजवळील ग्रोडजिएक जंगलात “डेनार कालिस्ज” नावाच्या गटाने गुप्त खजिना शोधताना प्रचंड मोठा शोध लावला. अवघ्या पाच आठवड्यांत त्यांनी अनेक प्राचीन वस्तू शोधल्या, त्यातील सर्वात मौल्यवान म्हणजे पाचव्या शतकातील सोन्याचा हार. त्याच मोहिमेत त्यांना रोमन काळातील स्मशानभूमी, योद्ध्याचे अवशेष, भाला आणि ढालीचे तुकडे मिळाले. या शोधांमुळे केवळ ब्रिटनच नव्हे तर संपूर्ण युरोपमध्ये प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचे नवे धागेदोरे मिळण्यास मदत झाली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय