राज्यात सध्या हवामानाने अनपेक्षित वळण घेतले असून उन्हाळ्याच्या (weather) मध्यातच उष्णतेसोबत अवकाळी पावसाचे दुहेरी चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तीव्र उष्णतेची लाट जाणवत असताना आता अचानक ढगाळ वातावरण, मेघगर्जना आणि हलक्या सरींनी अनेक भागांना झोडपले आहे. या बदलामुळे नागरिकांसोबतच शेतकरी वर्गही संभ्रमात पडला आहे.हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार गुरुवार, ९ एप्रिल रोजी राज्यात हवामानाची ही मिश्र स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण अधिक जाणवणार असून दिवसभर उकाडा त्रासदायक ठरू शकतो. त्याचवेळी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरणात अचानक बदल होऊन काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या अवकाळी पावसामुळे काही भागात तात्पुरता गारवा निर्माण होऊ शकतो,(weather) मात्र पिकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, पुढील काही दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते, तर किमान तापमानातही दक्षिण भागात थोडी वाढ अपेक्षित आहे. त्यानंतर तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे, मात्र उष्णतेची तीव्रता कायम राहू शकते.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही आकाश अंशतः(weather) ढगाळ राहण्याचा अंदाज असून उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो. कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. एकूणच राज्यात सध्या उष्णता आणि अवकाळी पावसाचा संगम दिसून येत असून पुढील काही दिवस हवामानाचा हा बदलता मूड कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले
युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर