थकीत वीजबिलांच्या वाढत्या ओझ्यामुळे आर्थिक (financial trouble) अडचणीत सापडलेल्या ‘महावितरण’ कंपनीच्या विभाजनाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार राज्यातील सुमारे ४५ लाख कृषिपंपधारक ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. महावितरणच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शेअर बाजारातून निधी उभारण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

वीज वितरण क्षेत्रात (financial trouble) कार्यक्षमता वाढवण्यासाठी २००५ साली राज्य विद्युत महामंडळाचे विभाजन करून ‘महावितरण’, ‘महानिर्मिती’ आणि ‘महापारेषण’ या स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या दोन दशकांत महावितरणवर थकीत वीजबिलांचे प्रचंड ओझे साचले आहे. सध्या या थकबाकीचा आकडा ९० हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. याशिवाय कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्जही आहे, ज्यामुळे वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणेही कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर कृषिपंपधारक ग्राहकांना वेगळ्या कंपनीत स्थानांतरित करून (financial trouble) महावितरणचे ‘बॅलन्सशीट’ हलके करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे भविष्यात महावितरणची शेअर बाजारात नोंदणी करून प्रारंभिक समभाग विक्री (IPO) काढण्याचा मार्ग सुकर होईल, असा दावा केला जात आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्याची प्रचंड थकबाकी नेमकी कोण वसूल करणार, ती महावितरणकडेच राहणार की नव्या कंपनीवर टाकली जाणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे वीज क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कामगार संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
कामगार संघटनांनी या (financial trouble) विभाजनाला विरोध दर्शवला असून, सरकारने कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. भविष्यात थकबाकी पुन्हा वाढणार नाही याची हमी कोण देणार, तसेच वसुलीची प्रभावी यंत्रणा काय असेल, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, तज्ज्ञांचे मत आहे की केवळ कंपन्यांचे विभाजन करून समस्या सुटणार नाही. महावितरणने आपली कार्यप्रणाली सुधारली नाही, तर पुन्हा आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. ग्राहकांमध्ये वेळेवर वीजबिल भरण्याची सवय निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात.
हेही वाचा :
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले
युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर