इराण–अमेरिका तणावाला तात्पुरता दिलासा मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात (temporary relief) कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाली असली, तरी त्याचा थेट परिणाम देशातील पेट्रोल–डिझेल दरांवर झालेला दिसत नाही. दोन आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर झाल्याने जागतिक बाजारात स्थैर्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना, भारतातील इंधनदर मात्र बहुतांश ठिकाणी स्थिरच राहिले आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये (temporary relief) आज पेट्रोल आणि डिझेलचे दर फारसे बदललेले नाहीत. मुंबई येथे पेट्रोल १०३.४५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. ठाणे मध्ये पेट्रोल १०४.३७ रुपये असून डिझेल ९०.८६ रुपये प्रति लिटर आहे. सोलापूर येथे पेट्रोलचा दर १०५.०४ रुपये तर डिझेल ९१.५६ रुपये प्रति लिटर आहे.

सातारा मध्ये पेट्रोल १०४.५२ रुपये आणि डिझेल ९१.०४ रुपये दराने उपलब्ध आहे. (temporary relief) पुणे येथे पेट्रोल १०४.७० रुपये आणि डिझेल ९१.२१ रुपये प्रति लिटर आहे. नाशिक मध्ये पेट्रोल १०४.९६ रुपये तर डिझेल ९१.४७ रुपये दराने विकले जात आहे.तसेच कोल्हापूर येथे पेट्रोल १०४.२४ रुपये आणि डिझेल ९०.७९ रुपये प्रति लिटर आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये पेट्रोलचा दर १०५.२४ रुपये तर डिझेल ९१.७३ रुपये प्रति लिटर आहे.एकूणच, कच्च्या तेलाच्या दरात घट झाली असली तरी स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि इतर घटकांमुळे पेट्रोल–डिझेलच्या दरांमध्ये तातडीने मोठा बदल दिसून येत नाही. त्यामुळे ग्राहकांना सध्या तरी दरकपातीसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले

युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *