बुलढाणा जिल्ह्याच्या लोणी गवळी गावातील एका प्राथमिक शाळेत (assaults) एका शिक्षकाने तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाळेतील बाल लैंगिक शोषणाच्या घटना सातत्याने घडत आहेत. शाळांमध्ये मुलीवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत असल्याने मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. पालक मुलींना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत.

लोणी गवळी गावातील हा संतपाजनक प्रकार उघडकीस (assaults)आल्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील एका ९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत ५८ वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. आज सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना कळताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला माराहण केली.

तात्काळ या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली व (assaults)पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले होते. मात्र गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास मज्जाव करत होते. गेल्या तीन तासांपासून शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढत या आरोपी शिक्षकाला डोनगाव पोलीस स्थानकात आणले आहे, सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना बाकी असताना आणि वयोवृद्ध असताना नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलं.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *