कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

इराणवर अति महासंहारक हल्ला करणार अशी घोषणा करून (now) संपूर्ण जगाला चिंतेत टाकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पंधरा दिवसांची शस्त्र संधी जाहीर करून सर्वांनाच चकित करून टाकले आहे. चाळीस दिवस चाललेल्या या युद्धात इजराइल अमेरिका आणि इराण यांनी आम्हीच जिंकलो आहोत असा दावा केला आहे. असा जेव्हा दावा केला जातो तेव्हा दोघांनीही
हे युद्ध जिंकलेले नसते असा त्याचा अर्थ होतो. दोघेही जिंकले आणि दोघेही हरले असे म्हणता येईल. बुधवारच्या रात्री इतका मोठा भीषण हल्ला करण्यात येईल की त्यामध्ये संपूर्ण इराण त्याच्या संस्कृतीसह नामशेष होईल असा इशारा ट्रम्प यांनी मंगळवारी दिला होता. मात्र या हल्ल्यात अमेरिका अण्वस्त्रांचा वापर करणार नाही असा खुलासाही केला होता. पण तरीही पश्चिम आशियासह संपूर्ण जग हादरून गेले होते. इराण मध्ये नागरिकांनी रस्त्यावर येऊन मानवी साखळी तयार केली होती.
पण नंतर अचानक ट्रम्प यांनी पंधरा दिवसांची केलेली शस्त्र संधी, काही अटी घालून इराणने मान्य केली आहे आणि आता पाकिस्तानच्या इस्लामाबाद मध्ये इराण अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध बंदीच्या संदर्भात चर्चा होणार आहे.

इराण मधील सर्वसामान्य जनतेने उठाव करून तेथील सत्ता उलथवून टाकावी, (now) इराणने सपशेल शरणागती पत्करावी, अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम कायमसाठी थांबवावा,अशा काही अटी इजराइल अमेरिका यांनी इराण समोर ठेवल्या होत्या. आणि या अटी फेटाळल्यानंतर दिनांक 28 फेब्रुवारी रोजी इराणवर संयुक्त हल्ला चढवला होता. या युद्धाचे तीव्रता हळूहळू वाढत गेली आणि ती दुसऱ्या महायुद्धा इतकी भीषण बनली होती. पश्चिम आशियातील सर्व देश या युद्धामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या होरपळले होते. भारतामध्ये सर्व प्रकारच्या इंधनाची भीषण टंचाई निर्माण झाली होती. देशभरातील अनेक उद्योग बंद पडले होते. दळणवळणावर गंभीर परिणाम झाला होता. अतिशय महागड्या दराने इंधन खरेदी केल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले होते. भारतीय शेअर मार्केट मधील मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. गुंतवणूकदारांचे सदतीस लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. बांगलादेश, पाकिस्तान, तुर्कस्तान, क्युबा वगैरे देशांना लॉकडाऊन करावे लागले होते. एकूणच अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. खुद्द अमेरिकेसह अनेक देशांमध्ये युद्ध थांबवा अशी मागणी घेऊन लोक रस्त्यावर आले होते. अखेर ट्रम्प यांनी पंधरा दिवसांची शस्त्रसुंधी जाहीर केली. पण इराणने काही अटी शर्ती ठेवून ही शस्त्र संधी मान्य केली आहे. आता चर्चेच्या टेबलावर या युद्धखोर देशांमध्ये वाटाघाटी होणार आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते मोजताब अली खामेनी यांनी हे युद्ध इराणने जिंकले आहे (now) असे जाहीर केले आहे तर अमेरिकेने हे युद्ध एकतर्फी जिंकले आहे अशी घोषणा व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने केली आहे. वास्तविक या युद्धामध्ये अमेरिकेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही कारण हा देश युद्धभूमीपासून 12 हजार किलोमीटर अंतरावर होता. इस्रायल चे नुकसान झाले आहे त्याचबरोबर दुबई, ओमान, कतार, बहारीन, सौदी अरेबिया, शारजा, लेबनॉन, संयुक्त अरब अमिरात या देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान इराणचे झाले आहे. याशिवाय जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. गमावण्यासारखे आता काही राहिलेलेच नाही अशी अवस्था या युद्धात इराणची झाली होती. या युद्धात इराणमच्या एका स्कूलमधील 150 पेक्षा अधिक लहान विद्यार्थी मारले गेल्यानंतर या युद्धात इराणला मोठी सहानभूती मिळाली होती.
आता पंधरा दिवसांची शस्त्र संधी झाली आहे. चर्चेनंतर हे युद्ध कायमसाठी पूर्णविराम घेईल. तथापि इराणने घातलेल्या अटी इजरायल अमेरिकेकडून मान्य होतील असे नाही.

कदाचित अनिश्चित कालापर्यंत हे महायुद्ध थांबेल असे म्हणता येईल. (now) इजराइल अमेरिका आणि इराण या दोन्ही बाजू कडून युद्ध जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि अमेरिकेने ज्या हेतूने हे युद्ध सुरू केले होते तो हेतू साध्य झालेला नाही तसेच इराणने केलेल्या मागण्या धुडकावून लावल्या गेल्यामुळे त्यांच्याही पदरात काही पडले आहे असे म्हणता येणार नाही. म्हणजे एकूणच दोघेही हरले आणि दोघेही जिंकले असे म्हणता येईल. पाकिस्तान सारख्या आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या देशाने या युद्धात शिष्टाई केली याबद्दल वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. कोणत्या देशाचा लवाद मान्य करायचा हे संबंधित देशांनी ठरवायचे असते. पण त्यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधण्याचा काहीजण प्रयत्न करताना दिसतात. नरेंद्र मोदी हे डरपोक उंदीर आहेत, त्यांनी या युद्धात टेलिफोन ऑपरेटरची भूमिका बजावली अशा प्रकारची भाषा वापरताना आपण या देशाची निंदानालस्ती करत आहोत याचेही काही जणांना भान राहिलेले दिसत नाही.

पण या चाळीस दिवसांच्या युद्धकाळात भारतात सर्व काही अलबेल होते. वितरण साखळीत थोडाफार विस्कळीतपणा आला होता आणि तो एकूण परिस्थिती पाहता, अपेक्षित होता. एनडीए सरकारचे परराष्ट्र धोरण युद्धखोर देशांना समान अंतरावर ठेवणारे होते. भारताने आपला स्वाभिमान गहाण ठेवला, अमेरिकेची गुलामगिरी पत्करली अशी टीका सुरक्षित वातावरणात राहून करणे सोपे आहे, प्रत्यक्षात परराष्ट्र धोरण म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत असते याचा टीका करणाऱ्यांनी विचार केलेला नव्हता आणि नाही. आता शस्त्रसंधी झाल्यानंतर भारतासह पश्चिम आशियामधील दैनंदिन जीवन पूर्वपदावर येईल.
इंधनाचे दर कमी होतील आणि टंचाईग्रस्त वातावरण सुद्धा निवळेल अशी आशा करायला हरकत नाही.

हेही वाचा :

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले

युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *