कोल्हापुरात हनुमान जयंतीनंतर शिवाजी पेठेत पारंपरिक माही (Customers) यात्रेच्या निमित्ताने मटण खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. पहाटेपासूनच लोकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडरनंतर आता मटणासाठीही रांगा लागल्याने शहरात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे.

या माही परंपरेनुसार यंदा मटण ८०० रुपये किलो दराने विकले जात असले,(Customers) तरी बाजारातील नेहमीच्या दराच्या तुलनेत ते स्वस्त मानले जात आहे. साधारणपणे ६२० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या मटणाच्या तुलनेत दर्जेदार आणि ताजं मटण मिळत असल्याने नागरिकांचा ओढा वाढला आहे. अनेकजण सकाळपासूनच रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची वाट पाहत आहेत.

मटणाची मागणी लक्षात घेऊन ट्रकभर बकऱ्या आणण्यात आल्या आहेत (Customers) आणि विक्रीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ही माही यात्रा कोल्हापुरात वर्षानुवर्षे साजरी केली जाते आणि मटणप्रेमींसाठी ती खास पर्वणी मानली जाते. “ताजं आणि चांगलं मटण मिळत असेल तर रांगेत उभं राहणं काही नवीन नाही,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. यंदा मात्र गर्दी अधिक असल्याचेही अनेकांनी नमूद केले.शिवाजी पेठेतील या दृश्यामुळे कोल्हापुरकरांची मटणाविषयीची आवड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. परंपरा, चव आणि उत्सव यांचा संगम असलेल्या या माही यात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

”आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

 महाराष्ट्राच्या प्रशासनात ‘बदली’ वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *