शहापूर पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी उघडकीस आणल्याचा दावा केलेल्या (investigation) तब्बल नऊ घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत आता गंभीर संशय निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले असून, सुमारे चव्वेचाळीस तोळे सोन्याचे दागिने जप्त केल्याच्या कारवाईविरोधात तक्रारी दाखल झाल्याने चौकशीला वेग आला आहे. या प्रकरणाची चौकशी अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.तारदाळ येथील घरफोडीचा तपास करत असताना शहापूर पोलिसांनी जयसिंगपूर, सांगली, कुरुंदवाड आणि वडगाव परिसरातील घरफोड्यांचा छडा लावल्याचे जाहीर केले होते. मात्र, वडगाव पोलिस ठाण्याने आरोपी ताब्यात घेतल्यानंतर सोन्याचा मुद्देमाल शहापूर पोलिसांकडे दिल्याचा दावा केल्याने वडगाव आणि शहापूर पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला असून या प्रकारामुळे गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आरोपीकडून जप्त करण्यात आलेली दुचाकी मुद्देमालात दाखवण्यात आली (investigation)नसल्याची गंभीर तक्रार पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेवर संशय बळावला आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर आणि सांगली परिसरातील चोरीचे दागिने पोलिसांना देणाऱ्या सोनारांना बोलावून त्यांचे स्वतंत्र जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक, गुन्हा शोध पथकातील कर्मचारी आणि सध्या तपास करणारे वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांचीही सखोल चौकशी करण्यात आली आहे.शहापूर पोलिसांनी जबाबदारी स्वीकारत सोनारांकडून दागिने जप्त केल्याचे सांगितले होते.
मात्र, आता वडगाव पोलिसांकडून पुन्हा चौकशी सुरू झाल्याने संबंधित (investigation)सोनारांची अडचण वाढली आहे. चौकशीदरम्यान सोनारांनी शहापूर पोलिस ठाण्यातील गुन्हा शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या फोनवरील संभाषणांची रेकॉर्डिंग सादर केल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा तपशील आणि चौकशीत सोनारांकडून मिळालेल्या दागिन्यांचा आकडा प्राथमिक चौकशीत जुळत असल्याचे दिसत आहे. मात्र, घरफोडीतील दुचाकी मुद्देमालाबाबत अधिक संशय कायम असून, त्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे. सर्व बाबींची वस्तुनिष्ठ पडताळणी करून अंतिम चौकशी अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर केला जाणार असून, त्यानंतर पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार