उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या विमान अपघातात (Insurance) निधन झालेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जाधव यांचा 1 कोटी रुपयांचा अपघात विमा मंजूर झाला असून कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. या दुर्घटनेला आता एक आठवडा पूर्ण होत असतानाच हा महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये त्यांचे पीएसओ विदीप जाधव, दोन पायलट आणि फ्लाईट अटेंडंट यांचा समावेश होता. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं असून, जाधव यांच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांनी ‘न्यू इंडिया इन्शुरन्स’ कंपनीचा (Insurance) अपघात विमा घेतला होता. त्यांच्या निधनानंतर अवघ्या पहिल्याच आठवड्यात विमा कंपनीने 1 कोटी रुपयांचा दावा मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे.विदीप जाधव हे 2009 च्या बॅचचे मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल होते. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात सेवा दिली होती. गेल्या काही काळापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते.

विदीप जाधव हे मुंबईतील कळवा-विटावा परिसरात कुटुंबासह राहत होते. (Insurance) 28 जानेवारी रोजी सकाळी कामासाठी घराबाहेर पडताना त्यांच्या आईने “सांभाळून जा, लवकर ये” असा निरोप दिला होता. मात्र तीच भेट त्यांच्या कुटुंबियांसोबतची शेवटची ठरली. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी घरात पोहोचताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार असून, ते गेल्या 25 वर्षांपासून कळवा परिसरात वास्तव्यास होते. कर्तव्य बजावत असतानाच त्यांना वीरमरण आलं, अशी भावना कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांना वडिलांच्या उपचारांसाठी (Insurance) गावी जायचं होतं. त्यांचं मूळ गाव फलटण तालुक्यातील तरडवाडी असून ते बारामतीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्यांनी 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या दौऱ्याची ड्युटी स्वीकारली होती आणि बारामतीहून थेट गावी जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. ते घरीही “मी येतो” असं कळवून निघाले होते. मात्र अजित पवार यांच्यासोबतचा तो प्रवासच त्यांचा अखेरचा ठरला. आज त्यांच्या कुटुंबाला मिळालेला विम्याचा दिलासा दुःख कमी करू शकत नसला तरी भविष्यासाठी आधार ठरणारा आहे.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *