मैत्रीचं नातं हे इतर सर्व नात्यांपेक्षा वेगळं असतं. या नात्यात दोन्ही मित्र (talking)संकटाच्या काळात एकमेकांना साथ देतात. तसेच वाईट काळ आला की दोन्ही मित्र अशा प्रसंगांना एकत्रितपणे समारे जातात. अशा आदर्शवत मैत्रीची अनेक उदाहरणे आज समोर आलेली आहेत. परंतु आता अशाच एका मैत्रीचा भयानक शेवट समोर आला आहे. दोन्ही जिवलग मित्र असूनही बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने एका मित्राने दुसऱ्याचा क्रूर पद्धतीने खून केला आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याने मीच माझ्या मित्राचा खून केल्याचे कबूल केले आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून संशयाच्या भूताने आरोपी आणि मृत तरुण अशा दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हादरवणाऱ्या खुनाची ही घटना राजस्थान (talking)राज्यातील राजकोट शहरात घडली आहे. येथे निलेश धोखिया आणि महेश जेठवा हे दोन जिवलग मित्र होते. महेशने निलेशची चाकुचे वार करून हत्या केली आहे. निलेशला दोन मुले आहेत. निलेश हा माझ्या विवाहित बहिणीशी फोनवर बोलतो, असा संशय महेशला आला होता. हाच संशय नंतर वाढत गेला आणि त्याने निलेशचा खून केला. मंगळवारी 3 फेब्रुवारी दुपारी साधारण 3:30 वाजता खुनाची ही घटना घडली आहे. अवघ्या 44 सेकंदांमध्ये महेशने निलेशा जीव घेतला आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजकोट शहरातील स्पीडवेल चौकातील माधव हॉटेलजवळ ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेशची बहीण प्रज्ञा ही निलेशच्या संपर्कात होती. (talking)या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रज्ञाच्या नवऱ्याला आला होता. हीच बाब प्रज्ञाच्या नवऱ्याने महेशला सांगितली होती. त्यानंतर महेशच्या मनात निलेशबद्दल सूडभावना पेटली. दोघेही माधव हॉटेलजवळ उभे असताना त्यांच्यात वाद झाला. ‘मी तुझ्या बहिणीसोबत असाच बोललो असतो तर तुला कसं वाटलं असतं?’ असा सवाल करत महेशने निलेशवर चाकुने सपासप वार केले. निलेशची छाती, पोटावर खोलवर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. उपचारासाठी नेले असतना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.दरम्यान, आता महेश जेठवा याने आत्मसमपर्न केल्यामुळे त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *