महाराष्ट्रात एक रहस्यमयी शिव मंदिर आहे. या शिव(golden temple) मंदिरात स्त्री रुपातील गणेश मूर्ती आहे. पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे. औरंगजेबने येथे आक्रमण करुन अनेक मूर्त्यांची तोडफोड केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुस्लिम कामगारांनी या शिल्पांची पुनर्बांधणी केली.

महाराष्ट्रात एक असे रहस्यमयी मंदिर आहे जिथे स्त्री (golden temple)रुपातील गणेश मूर्ती पहायला मिळते. या मंदिराची रचना मशिदीप्रमाणे आहे.
महाराष्ट्रात डाव्या सोंडेचा, उजव्या सोंडेचा अशी विविध प्रकारच्या गणेश मूर्ती अनेक पहायला मिळतात. मात्र, महाराष्ट्रात एकमेव असे मंदिर आहे जेथे स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती पहायला मिळते.
गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते. या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते. हे मंदिर म्हणजे मूळचा मंगलगड नावाचा किल्ला होता.
मंदिरात स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती आहे. हा गणपती गणेश्वरी, लंबोदरी किंवा गणेशयानी नावाने ओळखला जातो.
मंदिराच्या गर्भगृहात पाच शिवलिंगे आहेत. ही सर्व शिवलिंगे एका खंदकात लपविली आहेत. फक्त प्रकाशातच ही शिवलिंग पहायला मिळते. वर्षातून दोन वेळा महादेवाच्या पिंडीवर सूर्य किरणांचा अभिषेक करण्यात येतो.
तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे बांधली गेली यावेळेसच हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे.
पुणे शहरापासून 54 किमी अंतरावर हे मंदिर आहे. या शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
पुण्यात पुरंदर येथे भुलेश्वर शिव मंदिर नावाचे रहस्यमयी मंदिर आहे. या मंदिरात गणपतीची स्त्रीच्या वेशभूषेतील मूर्ती पहायला मिळते.
हेही वाचा :
आज शेवटचा श्रावणी गुरूवार दत्तकृपेने मिळेल यश
Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?
Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ