बीडमधील वडवणी येथील स्थानिक न्यायालयात सरकारी वकिलाने (suicide)आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खिडकीला दोरी बांधून सरकारी वकिलाने आयुष्याचा दोर कापला. त्यामुळे परिसरात खळबळ एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. आत्महत्या करणाऱ्या वकिलाचे नाव विनायक चंडेल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी विनायक यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याबाबतचा शोध सुरू केला आहे. विनायक यांनी काही शेवटची चिठ्ठी ठेवली आहे का? याचा शोधही पोलिसांकडून घेतोय.

बीडच्या वडवणी स्थानिक न्यायालयात कार्यरत असलेले सरकारी (suicide)वकील विनायक चंडेल यांनी न्यायालय परिसरातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ न्यायालय परिसरात दाखल झाले असून तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

ठाकरे ब्रँडला मुंबईत मोठा धक्का, भाजप अन् शशांकराव पॅनलचा ‘बेस्ट’ विजय वकिलाने कोर्टातच केलेल्या या आत्महत्येमुळे न्यायालयीन वर्तुळात तसेच वकिलांच्या समुदायात मोठी खळबळ उडाली आहे.(suicide) सरकारी वकिलाने अशा प्रकारे न्यायालय परिसरातच जीवन संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे. पोलिसांकडून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…

‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *