कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांची संख्या मोठी आहे. त्यातच चालू स्थितीत किती आहेत, फायद्यात किती आहेत, अवसायानात किती निघालेल्या आहेत, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. या पतसंस्थांच्या निवडणुकांकडे (election) सर्वसामान्य माणसाचे लक्ष जातेच असे नाही.

मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्था सुद्धा अनेक संस्थांपैकी एक आहे. या संस्थेच्या निवडणुका यापूर्वी कितीतरी वेळा झाल्या आहेत पण या पतसंस्थेच्या यंदाच्या निवडणुकीकडे मात्र साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. कारण या निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यांनी स्वतंत्र पॅनल उभा केले होते, तथापि मदतीला राज ठाकरे असूनही उद्धव ठाकरे यांना या संस्थेतील नऊ वर्षांची सत्ता गमवावी लागली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या(election) पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या बेस्ट युतीची ही निवडणूक म्हणजे'”लिटमस पेपर टेस्ट”होती आणि या टेस्टमध्ये त्यांना 0 गुण मिळून ते फेल झाले आहेत. मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम असलेल्या “बेस्ट” कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था आहे. गेल्या नऊ वर्षांपासून या पतसंस्थेवर उद्धव ठाकरे गटाची सत्ता आहे. मुंबई महापालिकेच्या तुलनेत अगदीच किरकोळ असलेल्या या सहकारी पतसंस्थेच्या निकालावरून ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या संपले, ठाकरे ब्रँड संपला असे म्हणता येणार नाही पण तरीही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन लढवलेल्या या पतसंस्थेच्या निवडणुकीकडे लिटमस पेपर टेस्ट म्हणून पाहिले जात होते.

तब्बल 18 वर्षानंतर ठाकरे बंधू दोन महिन्यापूर्वी मराठीच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार या चर्चेला उधाण आले होते. बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.
या निवडणुकीत शशांक राव, ठाकरे बंधू आणि महायुती यांची तीन पॅनेल्स उभा होती. म्हणून या निवडणुकीला रंगत आली होती.

शशांक राव यांच्या पॅनेलने 21 पैकी 14 जागा जिंकल्या तर महायुतीने सात जागा जिंकल्या. तब्बल नऊ वर्षे सत्ता असूनही उद्धव ठाकरे यांना एकही जागा जिंकता आली नाही. शशांक राव यांनी या निवडणुकीत(election) निर्विवाद बहुमत प्राप्त केले असले तरी ते स्वतः भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे या पतसंस्थेत भाजपची सत्ता आली आहे असे म्हणता येईल.

ठाकरे बंधूनी मराठीचा मुद्दा अस्मितेचा केला आहे. महाराष्ट्रावर हिंदी भाषा सक्ती सहन केली जाणार नाही अशी भूमिका घेऊन मुंबईत एक जन आंदोलन उभा केले होते. त्यानंतर कबूतरखाने हटाव, स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंदच्या विरोधात उठवलेला आवाज, दहीहंडीचा निमंत्रण नको मटण हंडीच निमंत्रण द्या अशी राज ठाकरे यांनी केलेली मिस्कील टिपणी, आम्ही नवरात्रातसुद्धा मांसाहारी नैवेद्य दाखवतो हे आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य या पार्श्वभूमीवर बेस्टची ही निवडणूक झाली. आणि ठाकरे बंधूंच्या खाद्य संस्कृतीचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला अशी सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे.

ही निवडणूक निर्विवादपणे जिंकणाऱ्या शशांक राव यांनी उद्धव ठाकरे यांनी या पतसंस्थेत मनमानी कारभार केला. सभासदांच्या हिताचा विचार केला नाही. फक्त स्वतःचा विचार केला. त्यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या कारभाराची आम्ही चौकशी करणार आहोत असे राव यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे.

बेस्टच्या निवडणूक(election) मतदानाच्या आधी एक दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी महायुतीकडून मतदारांना मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप केला होता. या निवडणुकीचे मतदान बॅलेट पेपरवर झाले त्यामुळे अपयशाचे खापर ईव्हीएम वर फोडता येत नाही म्हणून पैशाच्या वाटपाचा आरोप केला गेला. तर या निवडणुकीचा निकाल म्हणजे आमची परीक्षा नव्हे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी या निकालानंतर दिली आहे.

राज ठाकरे यांच्याशिवाय उद्धव ठाकरे गटाने या पतसंस्थेचे निवडणूक लढवली असती तर तिकडे कुणाचे लक्षही गेले नसते किंवा निवडणुकीतील पराभवावर फारशी चर्चाही झाली नसती. पण या निवडणुकीत प्रथमच ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन सेना एकत्र आलेल्या होत्या, आणि म्हणूनच या निवडणुकीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले होते. कारण मुंबई महापालिकेसह इतर काही महापालिकां निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. प्रामुख्याने या निवडणुका मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूं कडून लढवल्या जाणार आहेत.

या निवडणुकीमध्ये त्यांची नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधण्यासाठी म्हणून बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. एका अर्थाने ठाकरे बंधूंच्यासाठी ही लिटमस पेपर टेस्ट होती आणि त्यामध्ये ते पूर्णपणे फेल झाले आहेत. या निवडणुकीतील अपयशाचे ठाकरे बंधूंना विशेषता उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, विनायक राऊत वगैरे मंडळींना आत्मचिंतन करावे लागणार आहे.

हेही वाचा :

गर्लफ्रेंडचा माजी सरपंचावर लग्नासाठी दबाव, सात तुकडे करून….

एकाच वेळी आईला अन् गर्भवती लेकीला मृत्यूनं कवटाळलं….

सुमेध पेंडुरकर यांना टेक्सास ए-अँड एम विद्यापीठातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये पीएचडी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *