एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. (freshers)एका मुलीने फ्रेशर्स पार्टीसाठी आईकडे नवी साडी मागितली होती. पण आईने ती दिली नाही म्हणून तिने टोकाचे पाऊल उचलले आहे. आता तिने नेमकं काय केलं जाणून घ्या…आईने नवी साडी दिली नाही म्हणून विद्यार्थिनीने जुन्या साडीनेच… हादरुन टाकणारी घटनाआजची तरुण पिढी छोट्या-छोट्या गोष्टींवर आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशच्या सत्य साई जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे उषा नावाच्या एका इंटरमीडिएट विद्यार्थिनीने नवीन साडी न मिळाल्याने आईच्या जुन्या साडीचा वापर करुन स्वत:ला संपवले आहे. तिने उचललेले पाऊल पाहून सर्वांना धक्का बसला आहे. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया…

आजच्या तरुण पिढीला आपल्या जीवाची किंमत नाही. प्रेमात अपयश, प्रेयसीशी बोलता न येणे, शाळेतील शिक्षकांचा ओरडा, घरात आई-वडिलांचा राग, मागितलेल्या गोष्टी न मिळणे यासारख्या कारणांमुळे ते आपले आयुष्य संपवतात. असाच एक प्रकार आंध्र प्रदेशच्या सत्य साई जिल्ह्यात घडला आहे.(freshers) एका इंटरमीडिएटच्या विद्यार्थिनीने घरी जुन्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आईने तिला नवीन साडी घेऊन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मावरम बालाजी नगर येथील रहिवासी उषा ही स्थानिक कॉलेजमध्ये इंटरमीडिएटची विद्यार्थिनी होती. तिच्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स डे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तिने आपल्या मैत्रिणींना नवीन कपडे घालून पार्टीला येण्याचा दावा केला होता. याच कारणामुळे उषाने नवीन कपडे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तिने घरी जाऊन आपल्या आईला याबाबत सांगितले. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित फ्रेशर्स पार्टीसाठी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी उषा गेल्या काही दिवसांपासून आपल्या आईकडे साडीची मागणी करत होती. पण जेव्हा तिच्या आईने तिला सांगितले की, घरात आर्थिक अडचणी आहेत आणि नवीन साडी खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, तेव्हा उषा अचानक अस्वस्थ झाली.

तिच्या सर्व मैत्रिणी नवीन साड्या घालून येणार होत्या. मग नवीन साडीशिवाय ती फ्रेशर्स पार्टीला कशी जाऊ शकते? याच गोष्टीचा राग आल्याने उषाने टोकाचे पाऊल उचलले. जेव्हा घरी कोणी नव्हते, (freshers)तेव्हा तिने जुन्या साडीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा तिची आई घरी परतली आणि आपल्या मुलीला पंख्याला लटकलेले पाहिले, तेव्हा ती धक्क्यात गेली. आई रडत-रडत ओरडू लागली.
हेही वाचा :
महिलांनी कधीच करू नयेत या 4 चुका नाहीतर कुटुंबाची लागेल वाट!
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात! वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती; जैन गुहा क्रमांक 32 मध्ये…
प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य