राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)अजित पवार हे त्यांच्या राजकीय भूमिकांबरोबरच प्रशासकीय कामं करुन घेण्याची जाण आणि मिश्कील विधानांसाठी ओळखले जातात. अनेकदा पत्रकारांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नांना अजित पवारांनी अगदीच खोचक उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांना अचानक पत्रकारांनी वेगळा प्रश्न विचारल्यास ते आपल्या खास शैलीत अशा प्रश्नांचा समाचार घेताना दिसतात. असाच एक प्रकार आज वर्ध्यात घडला.

अजित पवार यांना त्यांची पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्यासंदर्भात विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी मध्येच हात जोडले, कपाळावर हात मारला आणि अगदी खोचक प्रतिसाद नोंदवला. अजित पवारांचं उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अजित पवारांनी आज आज वर्धा जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा आयोजित बैठकीत घेतला. जिल्हा परिषद, नगरविकास, कृषी व ग्रामविकास, जलसंपदा, वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा, पाणी व्यवस्थापन, जिल्हा वार्षिक योजना, सेवा ग्राम विकास आराखडा आणि रोजगार निर्मिती या विषयांवर सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.

आम्ही विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही. वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प वेळेत व दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावा, यासाठी संबंधित यंत्रणांना काळजी घेण्याचे निर्देश अजित पवारांनी बैठकीत दिले. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व सेवाग्राम विकास आराखड्याद्वारे सर्वसमावेशक प्रगती साधण्यावर आमचा भर असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, या बैठकीनंतर अजित पवारांनी (Deputy Chief Minister)पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना पत्नी सुनेत्रा पवारांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराने अजित पवारांना, “राष्ट्र सेविका बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या होत्या,” असं म्हणत प्रश्न विचारला. हे प्रश्न ऐकताच, “मी विचारतो, मला माहित नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनीट टू मिनीट माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का गं, कुठे गेली होती?” असं खोचक उत्तर अजित पवारांनी दिलं.

तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी अगदी पत्रकारांसमोर हात जोडत, “काय खरंच ना…” असं म्हटलं. नंतर कपाळाला हात लावत, “तुमचा अधिकार आहे. मात्र काय आपण प्रश्न विचारावेत. अजित पवार वर्ध्यात आला आहे. आपल्या वर्ध्याच्या विकासाच्या दृष्टीने काय विचारता येईल ते दिलं सोडून कुठं अजित पवार काय म्हणेल, कुठं ब्रेकिंग न्यूज देता येईल. मग अजित पवार काय म्हणाला दाखवती. मग तुमचं काय म्हणणं म्हणत समोरच्यांचं दाखवतील. काय चाललंय?” असा सवाल अजित पवारांनी विचारत नाराजी व्यक्त केली.

अजित पवार यांनी 21 ऑगस्ट 2025 रोजी वर्धा जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी जिल्हा परिषद, नगरविकास, कृषी व ग्रामविकास, जलसंपदा, वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा, पाणी व्यवस्थापन, जिल्हा वार्षिक योजना, सेवा ग्राम विकास आराखडा आणि रोजगार निर्मिती या विषयांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी अधिकाऱ्यांना विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

अजित पवारांनी सांगितले की, वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि सेवाग्राम विकास आराखड्याद्वारे सर्वसमावेशक प्रगती साधण्यावर सरकारचा भर आहे.पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने अजित पवार यांना विचारले, “राष्ट्र सेविका बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या होत्या.” हा प्रश्न त्यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या हालचालींबाबत होता.

हेही वाचा :

भावालं मारलं, वहिनीशी केलं लग्न, 2 मुलीही झाल्या अन्….

७१ हजार महिलांचा निर्णय धक्कादायक; आधार कार्डामुळे समोर आलं सत्य

“बॉलिवूडपासून गायब पण राणीप्रमाणे जगतेय सलमानची ही नायिका”

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *