गस्ट महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पावसाची दमदार हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आणि याच अंदाजानुसार मुंबई शहर, उपनगरांसह राज्याच्या इतरही भागांमध्ये (rains)पावसानं चांगलाच जोर धरला. कोकण आणि घाटमाथ्यावरील परिसरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला असतानाच राज्यातील धरण क्षेत्रांमध्ये झालेल्या पावसामुळं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाला आणि नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. तिथं धडकी भरवणारा आणि अजस्त्र लाटांचा मारा करणारा समुद्र चिंतेत भर टाकतच होता. मागील 24 तासांपर्यंत दिसणाऱ्या या चित्रात फारसा बदल झाला नसला तरीही पावसाचा जोर मात्र ओसरला आणि हीच मोठी दिलासायक बाब.

मुंबईत पावसाची विश्रांती मात्र…
मुंबई शहराचा वेग मंदावणाऱ्या या पावसानं आता कुठे विश्रांती घेतली आहे. असं असलं तरीही शहरातील पश्चिम उपनगरं आणि नवी मुंबई भागांमध्ये पावसाच्या सरी अधूनमधून (rains)नागरिकांची तारांबळ उडवणार असून ढगाळ वातावरण पाऊत आता येतो की नंतर, असाच प्रश्न उपस्थित करताना दिसेल.
पुढील 24 तासांसाठी कसं आहे राज्यातील पर्जन्यमान?
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा जोर तुलनेनं कमी आहे. हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, सातारा , पुणे इथं अधूनमधून पावसाच्या जोरदार सरींची हजेरी असेल ज्यामुळं या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि गोव्यापर्यंत मध्यम स्वरुपातील पर्जन्यमानाची शक्यता आहे. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह (rains)पावसाच्या तुरळक सरी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दुर्गम भागांमध्ये पावसाच्या तुरळक ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा, सांगली, कोल्हापूर इथं पावसाचा जोर अंशत: वाढणार असून, काही गावांमध्ये पूरस्थितीची चिंता सतावू शकते. तर, तिथं मराठवाड्यामध्ये हिंगोली, जालना, परभणीमध्ये हलक्या सरींची शक्यता सूचित होते. विदर्भात अमरावती, यवतमाळ, वाशिम वगळता उर्वरित भागांमध्ये पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
हेही वाचा :
भारतीय अजूनही रशियन सैन्यात…
अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात….
चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीने ओलांडली धोक्याची पातळी