पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली (water)असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी एक लाख 95 हजार क्यूसेक्स इतक्या विसर्गाने वाहत आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण वसाहतीत पाणी घुसल्याने जवळपास 250 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

कल्याण पूर्वेतील खड्ड्यांवर माजी नगरसेवक महेश गायकवाड आक्रमक झाले आहेत. सात दिवसांत रस्ते सुस्थितीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना पालिकेत घुसू देणार नाह, (water)त्यांचं विसर्जन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी एक लाख 95 हजार क्यूसेक्स इतक्या विसर्गाने वाहत आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण वसाहतीत पाणी घुसल्याने जवळपास 250 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे.
पावसाचा जोर पुण्यात ओसरला असून कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे. पुण्यात गेल्या 24 तासांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान गणेशोत्सवामध्ये पुण्यात मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची होणारे गर्दी लक्षात घेऊन स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वानाज ते रामवाडी मार्गावर मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
हेही वाचा :
‘काळी त्वचा चांगली नाही…’
राजघराण्याची डोकेदुखी वाढली, पुढे इतिहासच मिटवला
अर्जूनच्या साखरपुड्यानंतर सारानेही मनातलं सांगितलं, म्हणाली…