येत्या 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत(corporation) असून, मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटी महामंडळाने विशेष तयारी केली आहे. परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीत 5200 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 4479 गट आरक्षणाच्या आणि एकूण 5103 बसेस आतापर्यंत पूर्णपणे बुक झाल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील प्रमुख बसस्थानकांमधून या बसेस कोकणातील गावांपर्यंत सेवा देणार आहेत.

सवलती आणि आरक्षण सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी व्यक्तिगत आणि गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100% आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांना ५०% तिकीट सवलत दिली जाईल. (corporation) या सवलतींमुळे अधिकाधिक कोकणवासीयांना आपल्या गावी जाणे परवडणारे होईल, विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात. प्रताप सरनाईक यांनी नमूद केले की, गणपती बाप्पा, कोकणवासीय आणि एसटी यांचे अतुट नाते आहे. एसटी ही एकमेव वाहतूक सेवा आहे जी कोकणातील वाड्या-वस्त्यांपर्यंत थेट पोहोचवते. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या मुंबईकर कोकणवासीयांसाठी एसटी ही पहिली पसंती आहे.
वाहतूक आणि सुविधांची व्यवस्था
प्रवास सुखकर व्हावा यासाठी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बसस्थानक आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहतील. कोकणातील महामार्गांवर वाहनदुरुस्ती पथके तैनात असतील आणि प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरती प्रसाधनगृहे उभारली जातील. प्रताप सरनाईक यांनी सर्व गणेशभक्तांना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एसटी महामंडळाच्या या विशेष प्रयत्नांद्वारे कोकणवासीयांचा गणेशोत्सव आनंददायी होईल, असा विश्वास व्यक्त केला. या उपाययोजनांमुळे कोकणातील प्रवास सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.
गणेशोत्सव काळात बसस्थानके व बसथांबे याठिकाणी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. महामार्गांवर वाहन दुरुस्तीची पथके तैनात करण्यात आली असून प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे.मुंबई सेंट्रल, गिरगाव, महालक्ष्मी, दादर, जोगेश्वरी, कुर्ला-नेहरूनगर, अंधेरी, सांताक्रुझ, विलेपार्ले, वांद्रे, ठाणे-लोकमान्य नगर, भांडूप, मुलुंड, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, वसई, विरार, पनवेल, उरण आदी ठिकाणांहून या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
राजकीय पक्षांकडून ‘मोफत बससेवा’
एसटीच्या या तयारीसोबतच आगामी निवडणुकांचा विचार करून विविध राजकीय पक्षांनीही कोकणवासीयांसाठी मोफत बससेवेची घोषणा केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आदी भागांतून हजारो मोफत बसगाड्या कोकणात धावणार आहेत. गेल्या महिनाभरापासून विविध पक्षांच्या जनसंपर्क कार्यालयांत आधारकार्ड व मतदार कार्डाच्या आधारे अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष तर काही ठिकाणी व्हॉट्सअॅपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हेही वाचा :
‘हाफ सीए सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित!
रेल्वे कर्मचारी मोफत प्रवास करत नाहीत!
आजची श्रावण अमावस्या ‘या’ 5 राशींसाठी भाग्यशाली!