संजू सॅमसन याला बीसीसीआय निवड समितीने आशिया(selection) कप स्पर्धेसाठी संधी दिली आहे. संजूने या स्पर्धेआधी शतक ठोकत क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने 19 ऑगस्टला 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. (selection)तर भारतीय संघ आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेसाठी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन यालाही संधी देण्यात आली आहे. आशिया कप स्पर्धेसाठी अजून 2 आठवडे बाकी आहेत. मात्र त्याआधी संजूने आपण आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं जाहीर केलंय. संजूने केरळ क्रिकेट लीग 2025 स्पर्धेत स्फोटक शतक ठोकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

केरळ क्रिकेट लीग 2025 स्पर्धेत एकूण 6 संघात 21 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान एकूण 33 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. संजू सॅमसन या स्पर्धेत कोची ब्लू टायगर्सकडून खेळत आहे. संजूने या स्पर्धेतील आठव्या सामन्यात एरीज कोल्लम सेलर्स विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं. विशेष म्हणजे संजूने विजयी धावांचा पाठलाग करताना ही खेळी केली.

संजूची वादळी खेळी
एरीज कोल्लम सेलर्सने संजूच्या संघासमोर 237 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ओपनिंगला आलेल्या संजूने वादळी सरुवात केली. संजूने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. संजूने अर्धशतकानंतर अवघ्या 26 चेंडूत पुढच्या 50 धावा पूर्ण केल्या. संजूने अशाप्रकारे शतक पूर्ण केलं. संजूने या शतक खेळीत 13 चौकार आणि 5 षटकार झळकावले. आशिया कप स्पर्धेआधी संजूचं शतक भारतीय संघासाठी चांगले संकेत तर दुसऱ्या संघांसाठी धोक्याची घंटा आहे.

संजूला शतकाचं आणखी मोठ्या खेळीत रुपांतर करण्याची संधी होती. मात्र संजूला तसं करता आलं नाही. संजू शतकानंतर आणखी फक्त 21 धावाच करु शकला. संजूने 121 धावा केल्या. संजूने 51 बॉलमध्ये 237.25 च्या स्ट्राईक रेटने 121 रन्स केल्या. संजूने या दरम्यान 7 सिक्स आणि 14 फोर लगावले.

मुहम्मद आशिकची निर्णायक खेळी
संजू 19 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर आऊट झाला. संजू आऊट झाल्याने केरळ ब्लू टायगर्सचा स्कोअर 5 आऊट 206 झाला. मात्र त्यानतंर मुहम्मद आशिक याने चाबूक खेळी केली. कोचीने हा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. आशिकने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून विजय मिळवून दिला. कोचीने4 विकेट्सने प्रतिस्पर्धी संघावर मात केली. आशिकने 18 बॉलमध्ये 5 सिक्स 3 फोरसह नॉट आऊट 45 रन्स केल्या. आशिकची ही खेळी निर्णायक ठरली. तसेच मुहम्मद शानू याने 39 आणि विनोप मनोहरन याने 11 धावांचं योगदान दिलं.

हेही वाचा :

 आजचा सोमवार ‘या’ 5 राशींसाठी भाग्यशाली!

बजेटमध्ये घ्या अविस्मरणीय प्रवासाचा आनंद….

भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *