बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी(Actress) कमी वयातच जगाचा निरोप घेतला. त्यातील सर्वात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे दिव्या भारती. वयाच्या केवळ १९व्या वर्षी तिच्या मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. तिचा मृत्यू अपघात होता की कटकारस्थान, याबाबत आजही चर्चेला उधाण येते.

अलिकडेच चित्रपट निर्माता पहलाज निहलानी यांनी एका मुलाखतीत त्या घटनेबाबत आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी सांगितले की ५ एप्रिल १९९३ च्या रात्री दिव्या आपल्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटमधून पडली आणि तिचा मृत्यू झाला. त्यावेळी ती पूर्णपणे एकटी होती, आणि घटनास्थळी कोणीच उपस्थित नव्हते. निहलानी म्हणाले, “तिच्या निधनाच्या वेळी काय घडले हे कोणीच जाणले नाही.”
ते पुढे म्हणाले की, दिव्या कामाबद्दल अत्यंत समर्पित होती. एकदा शूटिंगदरम्यान तिच्या पायात खिळा घुसला होता, तरी दुसऱ्याच दिवशी सकाळी ती गाण्याच्या शूटसाठी हजर झाली. निहलानी यांनी तिच्या या व्यावसायिक वृत्तीचे कौतुक केले.
‘शोला और शबनम’ या चित्रपटात दिव्याला कसे कास्ट केले, याची आठवणही त्यांनी सांगितली. सुरुवातीला तिचे फोटो पाहून ते फारसे प्रभावित झाले नव्हते, परंतु नंतर वजन कमी करून ती जेव्हा पुन्हा फिल्म सिटीमध्ये आली, तेव्हा तिच्या व्यक्तिमत्त्वाने सर्वांना भुरळ घातली.

दिव्या भारतीच्या निधनानंतर जवळपास तीन दशकं उलटली तरी तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. चाहत्यांसोबतच चित्रपटसृष्टीतही तिच्या आठवणी कायम जिवंत आहेत(Actress).
हेही वाचा :
8 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही सरकारी नोकरीची संधी
यूट्यूबर अन् इन्फ्लूएन्सर्साठी नवीन नियम…..
ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’