ती 41 वर्षांची आणि तो 70 वर्षांचा… ओटीटीवर(OTT) महिन्याभरापूर्वी रिलीज झालेल्या या दोघांवर चित्रित करण्यात आलेला एका चित्रपटामधील 3 सेकंदांचा सीन सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून त्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. आपल्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीचं चुंबन हा ज्येष्ठ अभिनेता कसं घेऊ शकतो? असा सवाल टीका करणाऱ्यांकडून विचारला जातोय तर दुसरीकडे या साऱ्या गोष्टी अभिनयाचा भाग असल्याचं म्हणत या दिग्गज कलाकाराचं समर्थन त्याचे पाठीराखे करत आहेत.

मात्र सध्या व्हायरल झालेल्या या सीनमध्ये ज्या 41 वर्षीय अभिनेत्रीचं या ज्येष्ठ अभिनेत्याने चुंबन घेतलं तिनेच सर्व प्रकारावर पहिल्यांदा भाष्य केलं आहे. तिला याबद्दल काय वाटतं आणि तिने हे असं बोल्ड दृष्य चित्रित करण्यास होकार का दिला याबद्दल जाणून घेऊयात…
ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलतोय तो 70 वर्षीय अभिनेता म्हणजे कमल हसन आणि 41 वर्षीय अभिनेत्री आहे, अभिरामी! या दोघांची प्रमुख भूमिका असलेला ‘ठग लाईफ’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला त्यावेळीच त्यामधील एका किसींग सीनवरुन वादाला तोंड फुटलं. याबद्दल अभिनेत्री अभिरामीने दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका अगदी उघडपणे स्पष्ट केलेली. ‘ठग लाईफ’च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या किसींग सीनवरुन वाद निर्माण झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत आता चित्रपट प्रदर्शनाआधी वाद होणे हे सामान्य झाले आहे का? असा प्रश्न अभिरामीला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला.
ओटीटीवर ‘ठग लाईफ’ रिलीज झाल्यानंतर पुन्हा चर्चेत आलेल्या या किसींग सीनवरील वादासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना अभिरामीने, “आजकाल कशाचेही वादात रूपांतर होऊ शकतं. एक कलाकार म्हणून मला वाटत नाही की तुम्ही अशापद्धतीच्या वादामधून सुटू शकता. मणि सरांच्या तर्काचा आणि मला एका विशिष्ट भूमिकेत कास्ट करण्याबद्दलच्या निर्णयावर मी बोलू शकत नाही. खरं तर त्यांचे तर्क काहीही असले तरी मी त्या साऱ्याशी सहमत आहे, म्हणूनच मी चित्रपटात काम केलं आहे. ज्या किसींग सीनवरुन वाद झाला आहे तो फक्त तीन सेकंदांचा आहे,” असं म्हटलं. पुढे बोलताना, “ट्रेलरमध्ये फक्त तो किसींग सीनच दाखवला गेला होता, ही वास्तुस्थिती नाही.
हा असा दावा करणं दिशाभूल करण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही चित्रपट पाहताना तो सीन पाहाल तेव्हा सारा प्रकार किसपर्यंत का गेला हे पाहिल्यानंतर प्रेक्षक म्हणून तुम्हाला धक्का बसणार नाही. त्या घटनाक्रमासोबत तो सीन जातो. त्याबद्दल इतके बोललं जाणं हे मला थोडं अनावश्यक वाटतं. मार्केटिंग करणारे लोक चित्रपटासाठी जे काही फायदेशीर असेल ते करतील. मला चित्रपटाचा हा मार्केटींगचा पैलूदेखील समजतो. कोणतीही प्रसिद्धी ही चांगली प्रसिद्धी असते, असं ते म्हणतात. पण मी लोकांना निष्कर्ष काढण्यापूर्वी चित्रपट पाहण्याचा आग्रह करेन,” असंही अभिरामीने म्हटलं.
पण कमल हासन यांनी एका तरुणीला किस केल्यानंतर लोकांनी इतक्या तीव्र प्रतिक्रिया का दिल्या असाव्यात याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा पुढला प्रश्न अभिरामीला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “मला खरंच माहित नाही. कदाचित कमल सरांचा याआधीही असा धाडसीपणा दाखवण्याचा इतिहास आहे.
‘हे राम’मध्ये त्यांनी त्यांच्या दोन्ही सहअभिनेत्री राणी मुखर्जी आणि वसुधरा दास यांनी साकारलेल्या भूमिकांमधील जवळीक किती सुंदरपणे चित्रित केली आहे. कमल सर हे एक अतिशय धाडसी कथाकार आहेत. जेव्हा जेव्हा ते अभिनेता म्हणून एखाद्या दृष्यामध्ये स्वत:ला झोकून देतात तेव्हा लोक नेहमीच त्याबद्दल काहीतरी बोलतात. मोठ्या पडद्यावर दुसरा कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री किस करत नाहीत असंही काही नाहीये,” असं अभिरामी म्हणाली.
“जेव्हा एखाद्या वरच्या स्तरावरील अभिनेता असे करतो तेव्हा लोक त्याबद्दल बोलतात कारण त्यामुळे त्यांनाही फायदा होतो. खरं तर तुम्ही मगाशी बरोबर म्हणालात की आता हे असे वाद निर्माण करणे खूप सामान्य झाले आहे. मला वाटते की प्रेक्षकही योग्यवेळी परिपक्व होतील, अशी अपेक्षा अभिरामीने व्यक्त केली आहे.
किसींग सीनमुळे चर्चेत असलेला हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये 5 जून रोजी प्रदर्शित झालेला. काही आठवड्यांपूर्वीच तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून तिथे हा सिनेमा टॉप ट्रेण्डमध्ये आहे.
हेही वाचा :
रोहित – विराट ODI क्रिकेटला करणार अलविदा? 2027 च्या विश्वचषकापूर्वी होणार मोठा निर्णय
भयानक सेक्स रॅकेट! तीन महिन्यांत 200 जणांनी लचके तोडले, 12 वर्षीय मुलीची…
भर रस्त्यात पत्नीची पतीला बेदम मारहाण; केस पकडले अन् लगावली कानशिलात, Video Viral