क्रिकेटच्या(Cricket) विश्वातील महान खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या आई रजनी तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत अर्जुन तेंडुलकरची मंगेतर सानिया चंडोकही परिवारासोबत दिसली. फोटो शेअर होताच तो काही क्षणांतच व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रेम व्यक्त केलं.

आईच्या वाढदिवसानिमित्त सचिनने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यात तो म्हणतो, “तुझ्या पोटी जन्माला आलो, म्हणून मी घडलो. तुझा आशीर्वाद होता म्हणून मी प्रगती करत राहिलो. तू खंबीर आहेस म्हणूनच आम्ही सगळे खंबीर राहिलो. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!.”

शेअर केलेल्या फोटोत सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांच्यासह संपूर्ण परिवार एकत्र दिसत होता. यामध्ये अर्जुनची मंगेतर सानिया चंडोकही सहभागी झाल्याने हा क्षण आणखीनच खास ठरला.

हा वाढदिवसाचा कार्यक्रम तेंडुलकर परिवाराने गणेशोत्सवात मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा दर्शन घेतल्यानंतर साजरा केला. याआधी सचिन, अंजली, अर्जुन आणि सारा यांना लालबागच्या राजाच्या पंडालात दर्शन घेताना पाहिलं गेलं होतं(Cricket).

गेल्या काही आठवड्यांपासून अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याची चर्चा सुरू आहे. 25 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने 13 ऑगस्ट रोजी कुटुंब आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत एका खास समारंभात सानिया चंडोकशी साखरपुडा केला.

हेही वाचा :

Asia Cup 2025 स्पर्धेसाठी 7 संघ जाहीर, 

PPF Vs SIP, कुठे अधिक परतावा मिळेल, जाणून घ्या

टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *